Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Grampanchayat Award : पुरस्कार हे गावाचे वैभव

Rural Development : केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ न ठेवता ही चळवळ कायमस्वरूपी कशी टिकून राहील याची दक्षता प्रत्येक ग्रामपंचायतीने व गावोगावच्या लोकांनी घ्यावी.

Team Agrowon

Chh. Scambhajinagar News : केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ न ठेवता ही चळवळ कायमस्वरूपी कशी टिकून राहील याची दक्षता प्रत्येक ग्रामपंचायतीने व गावोगावच्या लोकांनी घ्यावी. कारण कोणत्याही स्पर्धा व अभियानातील पुरस्कार गावाचे वैभव असतात, असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ सोमवारी (ता. २३) संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. या अध्यक्ष स्थानावरून श्री. पाटील बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक ई. रविंद्रन, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ, विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, बीड जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री पाटील म्हणाले, की गावाचा दर्शनी भाग चांगला तर गाव आणि त्या गावातील लोकांची मने चांगली असे समजले जाते. माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तंटामुक्ती अभियान अशा अनेक चांगल्या संकल्पना आपल्यात रुजवण्याचे काम केले. ज्यांनी चांगले केले त्यांचे नाव घेतलच पाहिजे. सरपंचाकडे विकासाची अपेक्षा केली तर ग्रामपंचायतीचे करही भरण्यावर लक्ष द्यायला हवे. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, मंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले विचार व्यक्त केले.

दरवर्षी व्हावे पुरस्कार वितरण

जवळपास चार-पाच वर्षानंतर होणार हे पुरस्कार वितरण आनंद देणार आहे त्यासाठी कौतुक व अभिनंदन मात्र शासनाने दरवर्षीच विजेत्या स्पर्धक गावांना पुरस्काराचे वितरण करून अभियानाला प्रोत्साहन द्यायला हवे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील मानेची वाडी गावचे सरपंच रवींद्र माने यांनी व्यक्त केली. याच वेळी गावाच्या सूर्य घर योजनेतून सोलार गाव होण्यापर्यंतचा प्रवासही त्यांनी मांडला. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील शिरेगाव बांधचे सरपंच यांनीही गावाच्या आजवरच्या कार्याचा ऊहापोह केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT