Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : अकोल्यात सोयाबीनदर पोहोचला सरासरी ४६०० रुपयांवर

Soybean Rate : अकोल्यात शुक्रवारी (ता. ६) सोयाबीनला सरासरी ४६०० रुपयांचा दर मिळाला.

Team Agrowon

Akola News : मागील दोन-तीन दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये अचानक थोडी सुधारणा दिसून आली आहे. अकोल्यात शुक्रवारी (ता. ६) सोयाबीनला सरासरी ४६०० रुपयांचा दर मिळाला.

गेल्या महिनाभरातील दरांचा विचार केल्यास हा दर तुलनेने अधिक आहे. किमान दर पहिल्यांदाच चार हजारांवर पोहोचला. मात्र ही तेजी क्षणिक असल्याचे जाणकार सांगतात.

सोयाबीनचा नवीन हंगाम पुढील महिन्यात सर्वत्र होऊ शकतो. या आधीच बाजार समित्यात सोयाबीनच्‍या दरात थोडी सुधारणा दिसत आहे.

शुक्रवारी सोयाबीन किमान ४१०० रुपये तर कमाल ४७४५ रुपये दराने विक्री झाला. सरासरी ४६०० रुपयांचा दर होता. आवकही दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक म्हणजे २४४१ क्विंटल झाली होती.

गेल्या आठवड्यात या बाजारात सोयाबीनचा किमान दर ३८०० रुपयांपर्यंत मिळत होता. कमाल दरसुद्धा ४३०० च्या आतच होता. तर सरासरी दर ४२०० पर्यंत होता. पण आता गणेशोत्सवाच्या काळात सोयाबीनदरात अचानक सुधारणा झाली. ही सुधारणा सट्टा बाजारातील उलाढालींमुळे झाल्याचा कयास आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT