Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Mango Update : यंदा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्‍पादन झाले आहे. येथील बाजारपेठेमध्ये आंब्यांची आवक वाढली असून सर्वसामान्यांच्‍या खिशाला परवडतील, अशा दरामध्ये त्‍याची विक्री होत असल्‍याने खवय्यांकडून आनंद व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

Team Agrowon

Uran News : उरण तालुक्यात यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर आलेला होता. त्यामुळे यंदा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्‍पादन झाले आहे. येथील बाजारपेठेमध्ये आंब्यांची आवक वाढली असून सर्वसामान्यांच्‍या खिशाला परवडतील, अशा दरामध्ये त्‍याची विक्री होत असल्‍याने खवय्यांकडून आनंद व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

उरण तालुक्यात आमराई पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, आवरे, पाले, गोवठणे, कोप्रोली, पानदिवे, कळंबुसरे, चिरनेर, विंधने, कंठवली, भोम आदी गावांमध्ये हापूस, केशर, लंगडा, रत्ना राजापुरी, रायवळ, बिटकी, निमन्या पायरी, चौथापुरी, दशहारी इत्यादी सुधारित आंब्यांच्‍या जातींची झाडे लावण्यात आली आहेत.

तर शेतकरी आपल्‍या शेताच्‍या बांधावर, घरापुढे मोठ्या प्रमाणावर आंब्यांची झाडे लावतो. नवीन सुधारित कलम लवकर तसेच भरपूर प्रमाणात फळे देत आहेत. आंब्याच्या नवीन कलमांमुळे कमी जागेत जास्त झाडे येत असून त्‍यांना मुबलक फळेदेखील लागत आहे. यावर्षी वातावरण पोषक असल्यामुळे उरणमध्ये आंब्याची झाडे बहरलेली आहेत.

अनेक गावांमध्ये झाडांना मोठ्या प्रमाणात आंबे आले आहेत. वाढत्या उष्म्याचा ताप नागरिकांना होत असला तरी त्‍याचा फळांवर परिणाम झालेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंबा पंधरा ते वीस दिवस आधीच बाजारात दाखल झाला आहे.

उरण परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्यांना मोहोर आला होता. पोषक वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर आंबा पीक या भागात पाहायला मिळत आहे. सध्या ग्राहक बाजारातून आंबा खरेदी करण्यापेक्षा थेट घरी येऊन आंबे खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
-विकास म्हात्रे, शेतकरी, उरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसाचा वाढलेला भाव टिकून; हरभरा आवक वाढली, तूर दबावातच, सरकीचे दर टिकून तर पपईला मागणी

Weather Update in Maharashtra : मराठवाड्यात गारपीटीचा इशारा; कोकण, मध्यम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अंदाज

Agriculture AI: ‘एआय’ तंत्रज्ञानातून कमी खर्चात सुरू उसाचे एकरी १०४ टन उत्पादन

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग बदलण्याचे श्रेय शेतकरी संघर्ष समितीला

Honoring Women Farmers: सन्मान महिलाशक्तीचा...

SCROLL FOR NEXT