Expensive Mangoes : जगातील सर्वात महाग ६ आंब्याच्या जाती

Mahesh Gaikwad

आंब्याच्या जाती

जगभरात आंब्याच्या अनेक जाती पाहायला मिळतात. यापैकी काही जाती या चव, सुगंध, आकारासाठी प्रसिध्द आहेत. आज आपण जगातील आंब्याच्या ६ अशा जातींची माहिती पाहणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

Expensive Mangoes | Agrowon

मियाझाकी आंबा

जपानमध्ये पिकवला जाणारा मियाझाकी आंबा जगातला सर्वात महाग आंबा आहे. ज्याची एका किलोची अंदाजे किंमत २ ते २. ७० लाख इतकी आहे.

Expensive Mangoes | Agrowon

कोहितूर आंबा

भारतातील सर्वात महाग कोहितूर जातीचा आंबा मुर्शिदाबाद आणि बंगालमध्ये पिकतो. हा आंबा खूपच नाजूक असल्याने कापण्यसाठी बांबूचा चाकू वापरतात. याच्या एका आंब्याची किंमत १५०० रुपयांपर्यंत आहे.

Expensive Mangoes | Agrowon

नूरजहाँ आंबा

मुघल बादशाह जहांगीर याने आपली आवडती पत्नी नूरजहाँ हीचे नाव या आंब्याला दिले आहे. या आंब्याची किंमत प्रतिकिलो ५००-१००० रुपये इतकी आहे.

Expensive Mangoes | Agrowon

हापूस आंबा

जगातील सर्वात रसाळ आणि स्वादिष्ट आंबा हापूस आहे. हापूस आंबा प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणात पिकतो. हापूसची किंमत प्रतिडझन ५००-१००० रुपयांपर्यंत आहे.

Expensive Mangoes | Agrowon

सिंधरी आंबा

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील सिंधमध्ये पिकवला जाणारा सिंधरी आंबा त्याची चव आणि टिकाऊपणासाठी प्रसिध्द आहे. जागतिक बाजारात या आंब्याची किंमत ३००-४०० रुपये प्रतिकिलो सांगितली जाते.

Expensive Mangoes | Agrowon

काराबाओ आंबा

फिलिपीन्समध्ये पिकवला जाणारा काराबाओ आंबा चविष्टच नाही, तर महागही आहे. हा आंबा प्रति नग १५००-१६०० रुपयांना विक्री होतो.

Expensive Mangoes | Agrowon