Irrigation
Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation Scheme : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून शेतीपूरक व्यवसायास मिळेल चालना

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme) पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत मंजूर दोन प्रकल्पातून शेतीपूरक व्यवसायास चालना मिळून शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी येथे व्यक्त केला.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत पाणलोट कक्ष तथा माहिती केंद्र आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या बैठकीत मंजूर प्रकल्प क्र. १ व ३ या दोन प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता घेण्यासाठी सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीस पाणलोट कक्ष तथा माहिती केंद्राचे समिती सदस्य, तसेच सदस्य सचिव यांचे प्रतिनिधी सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी स्मिता रोंढे यांच्यासह कुर्डुवाडी व माढाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की प्रकल्प क्र. १ मध्ये सीएनबी, सीसीटी, शेततळे, विहीर पुनर्भरण ही कामे पूर्ण झाल्यानंतर भौगोलिक क्षेत्र ३०४३.६० हे. क्षेत्रावरील पडणाऱ्या पावसाचा पाणी अडवून एकूण अपधाव १२८९.८८ टीसीएम जलसाठा निर्माण होईल.

तसेच प्रकल्प क्र. ३ मध्ये शेतबांधबंदिस्ती, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, विहीर पुनर्भरण, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध ही कामे पूर्ण झाल्यानंतर भौगोलिक क्षेत्र ८१२५.०१ हे. क्षेत्रावरील पडणाऱ्या पावसाचा पाणी अडवून एकूण अपधाव ३५२५.९७ टीसीएम जलसाठा निर्माण होईल.

प्रकल्प अहवालाचे सादरीकरण

या वेळी मंडळ कृषी अधिकारी, कुर्डुवाडी यांनी प्रकल्प क्र. १ व मंडळ कृषी अधिकारी, माढा यांनी प्रकल्प क्र. ३ चे सविस्तर प्रकल्प अहवाल सादरीकरण केले.

यामध्ये पाणलोट प्रकल्प संदर्भातील गोळा केलेली मूलभूत माहिती जसे पायाभूत सर्वेक्षण, गाव सहभागीय मूल्यांकन, गावातील विहिरी, पशुधन व चारा उपलब्धता, जमीनधारक, जमिनीचा वापर, पीक उत्पादकतेची माहिती, गावाच्या ऊर्जेची गरज व उपलब्धता, तसेच नैसर्गिक साधनसामग्री आदींची माहिती सादर केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT