Pm Kisan Yojana KYC: पीएम किसानच्या लाभापासून राहावं लागेल वंचित; केवायसी कशी कराल?

या योजनेनुसार लोकसभा निवडणुकांच्या आधी मार्च २०१९ ला या योजनेचा पहिला हप्ता ३ कोटी १६ लाख १४ हजार ८८० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्या आला.
Pm Kisan
Pm Kisan Agrowon

Pm Kisan KYC: केंद्र सरकारने २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी (pm Kisan) योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याची अपेक्षा आहे.

१४ वा हप्ता लवकरच केंद्र सरकार जमा करेल, अशी शक्यता आहे. पण त्याआधी शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

केंद्र सरकार पीएम किसान योजनांचा लाभ थेट हस्तांतरण (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.

त्यामुळे शेतकऱ्यांचा बँक खात्याल आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. ई केवायसीसाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर केवायसी करता येते.

या वेबसाईट ओपन केल्यावर सुरुवातीला ई केवायसीचा पर्याय दिसतो. तिथे क्लिक करून शेतकरी आधार कार्ड नंबर नोंदवून केवायसी प्रक्रिया करू शकतात.

Pm Kisan
PM Kisan Scheme Login : लॉग-इन आयडीअभावी शेतकऱ्यांची हेलपाटे

तसेच बायोमेट्रिक केवायसीसाठी शेतकरी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन नोंदणी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ वा हप्ता जमा होण्यास अडचण येणार नाही.

केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली.

या योजनेनुसार लोकसभा निवडणुकांच्या आधी मार्च २०१९ ला या योजनेचा पहिला हप्ता ३ कोटी १६ लाख १४ हजार ८८० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्या आला.

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार २०२३ च्या मार्च वितरित करण्यात आलेला १३ व्यय हप्ता देशातील ८ कोटी ६९ लाख ९८ हजार ४९० शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात आला आहे.

या योजनेसाठी १०० टक्के निधी केंद्र सरकार पुरवते. वर्षभरात तीन टप्प्यात शेतकऱ्यांना ६ हजार रुपये रक्कम दिले जाते. दर चार महिन्यांने शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केले जातात.

दरम्यान, विरोधी पक्षाकडून या योजनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. योजनेच्या लाभार्थींची संख्या घटत असल्याचा आरोप केला गेला आहे.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com