Agril Exhibition, Akola Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV, Akola : ‘पंदेकृवि’मध्ये भरडधान्यांच्या पदार्थांसह कृषिजीवनाचा जागर

Team Agrowon

अॅग्रोवन वृ्त्तसेवा
Akola News : अकोला ः दरवर्षी डिसेंबरमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठात भरविले जाणारे कृषी प्रदर्शन यंदाही लक्षवेधी व माहितीचे दालन ठरले. विविध शेतकरी गटांनी भरडधान्यांच्या खाद्य पदार्थांची केलेली विक्री, ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन, कृषी पर्यटनाचे मॉडेल, विविध पीक पद्धतींचा अनुभव देणारे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा जागर ठरले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधत येथील कृषी विद्यापीठात कृषी विभाग, ‘आत्मा’तर्फे आयोजित तीनदिवसीय कृषी प्रदर्शन, महोत्सवाचा शुक्रवारी समारोप झाला. या महोत्सवाला विदर्भासह मराठवाडा, खानदेश व इतर राज्यांतील शेतकऱ्यांनीही सहभागी होऊन माहिती घेतली.

सेलसुरा (जि. वर्धा) कृषी विज्ञान केंद्राने यंदा अतिघन कापूस लागवडीचे मॉडेल प्रदर्शित केले. या जिल्ह्यात ११ एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड आहे. त्या पिकाची माहिती दिली जात होती. तसेच रेशीम शेती, कावेरी, कडकनाथ, कॅरी निर्भिक या तीन प्रजातींच्या कोंबड्यांचे पालन, कृषी पूरक उद्योगधंद्याची माहिती केव्हीके प्रमुख डॉ. जीवन कतोरे व त्यांच्या चमूकडून दिली गेली.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे औचित्य साधत येथील सातपुडा नॅचरलने मल्टी मिलेट्स आटा, बाजरी चिवडा, ज्वारी चिवडा व ज्वारीची बिस्किटे तयार करीत त्यांची विक्री केली.

थोडक्यात महत्त्वाचे...
- विविध दालनांवर महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांचीही रेलचेल
- खासकरून लिंबाचे पदार्थ, आवळा, चिंच, ज्वारी, बाजरी, नाचणी, नागलीचे पदार्थ ठरले आकर्षण


- विविध प्रकारची अवजारांनी वेधले लक्ष
- शेतकऱ्यांनी जाणले पीक संरक्षणासाठी कुंपण, सौर झटका, फवारणीचे नवनवीन तंत्र
- हजारो शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांनी घेतली माहिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT