PDKV Akola : पैदासदार बियाण्यासाठी ‘पंदेकृवि’ची धडपड

Seed Production : बदलत्या परिस्थितीनुसार कमी कालावधीत कीड, रोगांना प्रतिकारक्षम असणारे व अधिक उत्पादन देणारी पिके निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
Seed
Seed Agrowon

Akola News : बदलत्या परिस्थितीनुसार कमी कालावधीत कीड, रोगांना प्रतिकारक्षम असणारे व अधिक उत्पादन देणारी पिके निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यंदा खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या वर्षात अधिकाधिक प्रमाणात पैदासकार (ब्रीडर) बियाणे तयार करण्याची धडपड सुरू आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात व संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वात यंदाच्या खरीप हंगामात यासाठी काम सुरू आहे. या हंगामात सुमारे १२ हजार क्विंटल असे बियाणे उत्पादन करण्याच्या दृष्टीने लागवड झालेली आहे.

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधित केलेल्या वाणाचे पैदासकार (ब्रीडर सीड) बियाणे मिळावे अशी मागणी शेतकरी, महाबीज, कंपन्यांकडून केली जाते. हे बियाणे आजवर मागणीच्या तुलनेने कमी असल्याने त्याच्या पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण व्हायच्या.

Seed
Seed Bank : देशी वाणांचे संवर्धन करणारी शेतकरी कंपनी ॲग्रीकार्ट

ही बाब गांभीर्याने घेत कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रभार सांभाळल्यापासून आपले संपूर्ण लक्ष विद्यापीठातील प्रत्येक प्रक्षेत्रावर शुद्ध बियाण्यांच्या निर्मितीवर केंद्रित केले. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यापीठ प्रक्षेत्राला भेटी देत तेथील जमीन व हवामानाचा विचार करून त्यानुसार पिकांची लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान अवलंबिण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

विद्यापीठांतर्गत मध्यवर्ती संशोधन केंद्र, मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, विविध कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्र विद्यालयांच्या प्रक्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर या नगदी पिकांसह इतर तृणधान्य, गळीत धान्य, कडधान्यवर्गीय

Seed
Bogus Seed Act : बनावट निविष्ठांबाबतची विधेयके संयुक्त समितीकडे

पिकांची लागवड केली आहे. या वर्षी पावसाचे उशिरा आगमन झालेले असताना देखिल विद्यापीठाच्या बहुतेक प्रक्षेत्रांवर खरिपाची पिके बहरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. कुलगुरू डॉ. गडाख, संशोधन संचालक डॉ. खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे हे नियमित भेटीद्वारे प्रक्षेत्र अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

बारा हजार क्विंटलचे उद्दिष्ट

विद्यापीठ दरवर्षी बीजोत्पादन करीत असते. सन २०२२-२३च्या खरीप व रब्बी हंगामात ७९२० क्विंटलचे बीजोत्पादन झाले होते. या वर्षी खरीप हंगामात दुप्पट उत्पादनाचे नियोजन आहे. या हंगामापासून १८४४० क्विंटल बीजोत्पादनाचे नियोजन केले असून, त्यात ब्रीडर सीड उत्पादनावर अधिक भर देत १२ हजार क्विंटल, असे बियाणे उत्पादनाचे नियोजन आहे.

ब्रीडर सीडची गरज व मागणी पाहता विद्यापीठाने या बियाण्याच्या उत्पादन वाढीसाठी नियोजन केले आहे. निसर्गाची सकारात्मक साथ मिळाली, तर यंदाच्या खरीप हंगामात विद्यापीठ निर्मित शुद्ध, सकस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता निश्‍चित होऊ शकेल.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, पंदेकृवि, अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com