Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत जयसिंगपूरमध्ये ‘ठिय्या’ : शेट्टी

Swabhimani Uus Parishad: जयसिंगपूर येथे विक्रमसिंह क्रिडांगणावर ऐतिहासिक २२ वी ऊस परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यातील विविध भागातून ऊस उत्पादक शेतक-यांनी या परिषदेस ऊपस्थिती लावली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदाची पहिली उचल एकरकमी विनाकपात ३५०० रुपये प्रतिटन मिळावी, यासह मागील हंगामातील ४०० रुपये मिळावेत. ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत ऊस तोडी बंद राहतील. हा निर्णय होईपर्यंत जयसिंगपूर येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. ७) केली. ‘‘दिवाळीतील मुख्य चार दिवसांत खर्डा-भाकरी प्रत्येक कारखाना अध्यक्षाच्या घरी द्या,’’ असे आवाहन ही त्यांनी केले.
 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. ७) जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे ज्येष्ठ नेते राजाराम वाकरेकर अध्यक्षस्थानी होते.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘हे आंदोलन चुकीचे आहे, असे कारखानदार म्हणतात. पुढच्या हंगामात वाढवून देतो, मागचे मागू नका, असे कारखानदार म्हणत आहेत. प्रत्येक वर्षी सगळ्यांचा ऊस नसतो, त्या शेतकऱ्याने काय करावे? आमच्या हक्काचे पैसे मागतो. साखर चढ्या दराने विकली त्याचे पैसे आम्हाला द्या. अनेक कारखान्यांनी साखर विक्रीतही गैरव्यवहार केला आहे. त्यांची का तपासणी होत नाही. रिकव्हरी कशी चोरली जाते हे आम्ही दाखवतो. आम्हाला कारखान्यांवर चार माणसे नेमायची संधी द्या. हे लोक एवढी चोरी व काटामारी कशी केली याची माहिती देतील. आता शेतकऱ्यांना एक होऊन दर मागावा लागेल. त्यासाठी सर्वांनी गटतट विसरून लढावे लागेल. पहिल्यांदा मागचे द्या, तर पुढचे बघू, असे आम्हाला आता ठणकावून सांगावे लागेल.’’


परिषदेतील काही प्रमुख ठराव...
 

  • दोन टप्प्यांत एफआरपी देण्याच्या कायद्यात केलेल्या बेकायदेशीर दुरुस्तीबाबत शासन निर्णय तातडीने करावा.
     

  • शेतीपंपांचे भारनियमन रद्द करून विनाकपात दिवसा १२ तास वीज द्या.
     

  • ज्या सर्कलमध्ये खरिपाचे पीक वाया गेले, तो संपूर्ण भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा.
     

  • सर्व कारखान्यांचे काटे तातडीने ऑनलाइन करून एकाच प्रणालीमधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत.
     

  • वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल करून वाहतूकदारांचे पैसे वसूल करा
     

  • केंद्र व राज्य सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. धनगर, लिंगायत समाजाला त्यांच्या मागणीनुसार आरक्षण द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT