Tendu Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Tendu Leaf Income: तेंदूपाने संकलनातून यंदा सात कोटींचे उत्पन्न अपेक्षित

Gadchiroli Tendu Bonus: गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन हंगाम यंदा भरघोस नफा देतोय. वनविभागाने दरात सुधारणा करत मजुरांना बोनस म्हणून तब्बल सात कोटी रुपयांचे वितरण करण्याची घोषणा केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Gadchiroli News: दर्जा चांगला असल्याने जिल्ह्यात उत्पादित तेंदूपानांना बिडी उद्योगातून मागणी राहते. त्यानुसार यंदा तेंदूपत्ता संकलनातून सात कोटी २ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे संपूर्ण उत्पन्न वनविभागाकडून बोनस म्हणून संबंधित मजुरांना दिले जाते.

गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १ लाख ८० हजार हेक्‍टरवर धान (भात) लागवड होते. ही पीकपद्धती वगळता वन उपज हा देखील रोजगार व उदरनिर्वाहाचा मोठा पर्याय ठरतो. सध्या तेंदूपानाचा हंगाम सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात वनाखालील क्षेत्र मोठे असून, या भागातील तेंदूपानांचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे मागणीदेखील अधिक राहते. कंत्राटदारांकडून तेंदूपानाला चांगला भावही मिळतो.

गेल्या दोन वर्षांपूर्वी कंत्राटदार काही कारणांमुळे तेंदूपाने लिलावात सहभागी होत नसल्याने या व्यवसायात मंदी आली होती. परंतु यंदा वनविभागाचे सर्वच २५ युनिट चांगल्या दराने विकले गेले आहेत. परिणामी या क्षेत्रावरील मंदी दूर होत हजारो मजुरांना देखील रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी अवकाळी पाऊस झाला नाही.

परिणामी, तेंदूपानांवर सध्यातरी कोणत्याही कीड-रोगांचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. परिणामी, दर्जा चांगला असल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात तेंदूपानांचे संकलन होईल अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यातील तीनही वनक्षेत्रातून या वर्षी सुमारे ३७ हजार ८०० पोती (गोणी) तेंदूपाने संकलनाचे उद्दिष्ट आहे. त्यातून सात कोटी २ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून ही रक्‍कम वनविभागाकडून बोनस म्हणून संबंधित मजुरांना दिली जाते.

आलापल्ली वनविभागातील देवदा युनिटमध्ये सर्वाधिक चार हजार ५०९ रुपये प्रति गोणी इतका दर मिळाला आहे. म्हणजेच प्रति पुड्याची खरेदी चार रुपये ५० पैसे याप्रमाणे होईल. याउलट सर्वांत कमी दर आलापल्ली वनविभागातील मोहूर्ली युनिटला मिळाला आहे. केवळ ६१८ रुपये प्रति गोणी दराने येथील तेंदूपानांची खरेदी झाली. तेंदूपानाच्या संकलनातून रोजगाराची उपलब्धता होत असली, तरी गडचिरोलीत वाघांची दहशत आहे. त्यातूनच तेंदूपाने संकलनास गेलेल्या मजुरांवर हल्ला होण्याची शक्‍यता राहते.

मजुरीत ३५ रुपयांची वाढ

तेंदूपाने संकलनाचा मजुरी दर वनविभागाकडून निश्‍चित होतो. ठरविलेल्या दरानुसारच कंत्राटदाराला मंजुरी द्यावी लागते. गेल्या वर्षी वनविभागाने प्रति शेकडा ३९० रुपये मजुरी ठरविली होती. या वर्षी त्यात ३५ रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार यंदा ४२५ रुपये असा मजुरी दर राहणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मजुरांना बोनससुद्धा अधिक प्रमाणात मिळणार आहे.

वनक्षेत्रनिहाय तेंदूपाने संकलन

(गोणी) व उत्पन्न (लाख रुपयांत)

गडचिरोली ३,०५० ५७.६४

वडसा ३,६५० ४५.१३

आलापल्ली ३१,१०० ५९९.८४

एकूण ३७,८०० ७०२.६१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai BMC Election: ठाकरेंच्या हातून मुंबई निसटली, 'महायुती'ची बाजी

Climate Change Impact: ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना धसका

Sugarcane Farming: उसाची ६७ हजार हेक्टरवर लागवड

Environmental Research: नुसते संशोधन नव्हे, कार्यप्रवणता महत्त्वाची!

Food Processing Training: अन्न प्रक्रिया उद्योगासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT