Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam: ‘उजनी’तील दहा टीएमसी गाळ लवकरच निघणार : निंबाळकर

उजनी धरणात सुमारे १० टीएमसी गाळ साचल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

Team Agrowon

Pandharpur News : सोलापूर जिल्ह्याची (Solapur District) वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील (Ujani Dam) दहा टीएमसी गाळ काढण्यासाठी स्थापन करण्यात आळेल्या गाळ निष्कासन समितीचे अध्यक्षपदच गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे.

त्यामुळे धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया रखडली आहे. ही प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू करण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर (MP Ranjit Singh Nimbalkar) यांनी पुढाकार घेतला आहे.

उजनी धरण हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची एकूण १२३ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता आहे. धरणाच्या निर्मितीपासून एकदाही गाळ काढण्यात आला नाही.

सध्या धरणात किती गाळ साचला आहे, याचा पाटबंधारे विभागाने दोन ते तीन वेळा सर्व्हेदेखील केला आहे.

यातून उजनी धरणात सुमारे १० टीएमसी गाळ साचल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. गाळ काढण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे.

दरम्यान, या समितीचे अध्यक्षपद हे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे समितीचे काम ठप्प झाले आहे. राज्य सरकारने गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

उजनी धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी खासदार निंबाळकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी उजनीच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठकही घेतली. यावेळी या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

याबाबत लवकरच गाळ निष्कासन समितीच्या रिक्त अध्यक्षपदावर अनुभवी व्यक्तीची निवड केली जाईल, असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

उजनी धरणातील गाळ काढण्यासाठी गाळ निष्कासन समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून धरणात गाळ किती आहे, याचा सर्व्हे केला आहे. धरणात अंदाजे १० टीएमसी इतका गाळ साचला आहे. तो काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. परंतु समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्याने पुढची प्रक्रिया थांबली आहे.
आर. पी. मोरे, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, भीमानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT