Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : अग्रिम भरपाईचा लाभ साडेदहा लाख अर्जदारांना होणार

Crop Damage Compensation : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मीड सीझन डव्हर्सिटी) घटकातर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याची अधिसूचना लागू केली आहे.

Team Agrowon

Nanded News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मीड सीझन डव्हर्सिटी) घटकातर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याची अधिसूचना लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर व खरीप ज्वारी पिकांचा विमा भरलेल्या दहा लाख ५६ हजार ३१३ अर्जदार शेतकऱ्‍यांना परतावा मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्ट महिन्यामधील पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले होते.

अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्‍यांना पीक नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम रक्कम मिळण्याची जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिकची घट असल्याचे दिसून आले आहे.

समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मीड सीझन ॲडव्हर्सिटी) अधिसूचना लागू केली.

या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्वच ९३ महसूल मंडळांतील विमाधारक शेतकऱ्‍यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात २५ टक्के रक्कम अग्रिम परतावा देण्याचे विमा कंपनीला निर्देश दिले आहेत. या अधिसूचनेचा फायदा जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर व खरीप ज्वारी पिकांचा विमा भरलेल्या दहा लाख ५६ हजार ३१३ अर्जदार शेतकऱ्‍यांना होणार आहे.

या शेतकऱ्‍यांनी या चार पिकांखालील सात लाख १७ हजार ५४३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. तर यात शेतकरी, केंद्र शासन व राज्य शासन असा एकूण ६५४ कोटी ९८ लाखांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा होणार आहे.

पीकनिहाय विमा भरलेले अर्जदार शेतकरी

(संरक्षित क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक सहभागी अर्जदार विमा संरक्षित क्षेत्र विमा हप्ता

सोयाबीन ८,२३,७७७ ६,१९,११८ ६०७.३६ कोटी

कपाशी १,६०,८९६ ८१,६२९ ३९.९० कोटी

तूर ५६,६८९ १२,४५१ ६.६५ कोटी

ख.ज्वारी १४,९५१ ४,३४५ १.०७ कोटी

एकूण १०,५६,३१३ ७,१७,५४३ ६५४.९८ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT