Tembhu Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Scheme : दुष्काळी पट्ट्याला टेंभू योजनेचा आधार ; २.५ टीएमसी पाणी वितरित

Agriculture Irrigation : सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांसाठी रब्बी हंगामासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यास सुरू झाले.

Team Agrowon

Sangli News : सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांसाठी रब्बी हंगामासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यास सुरू झाले. सव्वा महिन्यात तब्बल अडीच टीएमसी पाणी उचलून दुष्काळी पट्ट्यातील लाभ क्षेत्राला दिले आहे, अशी माहिती टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सूत्रांनी दिली.

सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचन योजना सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार टेंभूचे रब्बीसाठी आवर्तन सुरू केले आहे. या आवर्तनामुळे ५५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे आवर्तन सुरू असून जोपर्यंत लाभ क्षेत्राच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत ही हे आवर्तन सुरू राहणार आहे.

टेंभूचे सध्या सुरू असलेले आवर्तन हे मुख्य कालव्यातून पुढे जात आहे. टप्पा अ १ आणि टप्पा ब १ या ठिकाणी एकूण ३३ पंप, तर आरफळचे दोन पंप टप्पा क्रमांक दोन २ पंप, तीन अ ९ पंप, टप्पा चार आणि टप्पा पाच अनुक्रमे २ असे एकूण ५५ पंप सुरू आहेत.

सव्वा महिन्यात टेंभू योजनेतून २.६१५ टीएमसी पाणी उचलून दुष्काळी पट्ट्यातील शेतीची तहान भागवली आहे. दरम्यान, या आवर्तनातून लाभ क्षेत्रातील तलाव भरण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, जानेवारी अखेर सिंचन व बिगर सिंचनापोटी ६ कोटी ११ लाख पाणीपट्टी वसूल झाली आहे. मार्चअखेर पर्यंत १८ कोटी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे.

थकित पाणीपट्टी भरावी, अन्यथा, सात-बारावर बोजा

सिंचन वर्ष २०२३-२४ मधील खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी कपात ही कारखान्यांमार्फत केली जाते. मात्र, लाभधारक पाणीपट्टी न भरता ते लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस घालवत असल्याने पाणीपट्टी थकित होते.

त्यामुळे पाणीपट्टी आकारणी करण्यात येऊन त्यांचे ७/१२ वर महसूल खात्यामार्फत बोजा नोंद चढवण्याची कार्यवाही केली जाणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व साखर कारखान्यांनी सर्वच लाभधारकांच्या ऊस क्षेत्राची पाणीपट्टी कपात करावी.

तसेच, ज्या लाभधारकांनी कारखान्यांकडे पाणीपट्टी जमा केली आहे, त्यांची व कपात केलेली पाणीपट्टी जमा करावी, असे आवाहन टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT