Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Scheme : ‘टेंभू’ची थकबाकी १६ कोटी ५० लाखांवर

Lift Irrigation : टेंभू उपसा सिंचन योजनेची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सांगली, सातारा आणि सोलपूर या तीनही जिल्ह्यांची १६ कोटी ५० लाखांवर थकबाकी पोहोचली आहे.

Team Agrowon

Sangli News : टेंभू उपसा सिंचन योजनेची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सांगली, सातारा आणि सोलपूर या तीनही जिल्ह्यांची १६ कोटी ५० लाखांवर थकबाकी पोहोचली आहे. वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्याने दरवर्षी थकबाकी वाढतच चालल्याने योजनेचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून एकूण २० बिलांपैकी १९ टक्के रक्कम पाणीपट्टीतून वसूल केली जाते. तर ८१ टक्के कृष्णा खोरे महामंडळ भरते. हा निर्णय चार वर्षांपूर्वी झाला होता. त्या पूर्वीअगोद शंभर टक्के वीजबिल पाणीपट्टीतून भरले जात होते.

८१-१९ चा निर्णय झाल्यानंतर पाणीपट्टीत मोठी सवलत मिळाली, तरीही थकबाकीचा आकडा दरवर्षी फुगत चालला आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी सहा महिने योजना सुरू होती. निवडणुकीचा काळ असल्याने वसुलीसाठी फारसा तगादा लावला नाही. परिणामी, कसलेच पैसे भरले नाहीत.

यंदा रब्बी हंगामासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आवर्तन सुरू केले आहे. योजनेचे ५५ पंपाद्वारे दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी दिले जात असून सुमारे अडीच टीएमसी पाणी उचलले आहे. योजनेमुळे सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

योजनेचे शाश्वत पाणी झाल्याने फळबागा, ऊस आणि भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बारमाही योजना सुरू राहणे गरजेचे आहे. मात्र, थकबाकी वाढत चालल्याने योजनेचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या बंदिस्त पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडे आहे. पुढच्या वर्षीपासून ते पाटबंधारे विभागाकडे येणार आहे.

त्यामुळे दुरुस्ती खर्चाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणीपट्टीची थकबाकी दरवर्षी वाढतच चालली आहे. कडेगाव तालुक्याची चार कोटी तीस लाख, सांगोला चार कोटी पन्नास लाख, खानापूर १ कोटी ४० लाख, कवठेमहांकाळ १ कोटी सात लाख, आटपाडी शाखा पाच कोटी ५३ लाखांवर थकबाकी आहे.

ही थकबाकी दिघंची, आटपाडी, कौठुळी, झरे, निंबवडे या भागातील आहे. तर सर्वांत कमी शाखा क्र. १ ची थकबाकी ४८ लाख ६४ हजार आहे.

शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न थकविता वेळेत भरावी. त्यामुळे शेतकऱ्यांची थकबाकी वाढणार नाही आणि योजना चालविण्याच्या खर्चाचाही प्रश्न निर्माण होणार नाही.
- महेश पाटील, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT