Canal Burst  Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Canal Burst : हटकर मंगेवाडीत टेंभूचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया

Tembhu Irrigation : टेंभू योजनेच्या कालव्याचे गेट अज्ञात इसमाने बंद केल्याने कालव्यामधील पाणी तुंबून निर्माण झालेल्या फुगवट्यामुळे कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना मंगळवारी (ता. १) हटकर मंगेवाडी येथे घडली.

Team Agrowon

Solapur News : टेंभू योजनेच्या कालव्याचे गेट अज्ञात इसमाने बंद केल्याने कालव्यामधील पाणी तुंबून निर्माण झालेल्या फुगवट्यामुळे कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना मंगळवारी (ता. १) हटकर मंगेवाडी येथे घडली. या घटनेत तब्बल ५५ लाख रुपयांचे तर या परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे माहिती प्राथमिक तपासणीतून समोर आली आहे.

याबाबत टेंभू योजनेचे शाखा अभियंता महेश मधुकर पाटील यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, सध्या टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. यामधून सांगोला तालुक्याला पाणी सोडले होते.

सोमवारी (ता.३१) रात्री बाराच्या सुमारास अज्ञात इसमाने टेंभू योजनेच्या कि.मी. ३६.५२० येथील कालव्याचे सीआर गेट बंद केल्याने मंगळवारी पाण्याचा फुगवटा होऊन हटकर मंगेवाडी गावाच्या हद्दीतील कालवा कि.मी. ३६.०० येथे फुटल्याचे पहाटे ५ च्या सुमारास निदर्शनास आले, ही बाब लक्षात आली असता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कालव्यामधील पाणीपुरवठा थांबविला. मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया जाऊन कालव्याचे तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

शासनासह शेतकऱ्यांचे नुकसान

टेंभू योजनेचे हे पाणी १६० क्युसेक वेगाने सांगोला तालुक्यासाठी सुरू होते. मात्र अचानक या मार्गात अज्ञात इसमाने दरवाजा टाकून पाणी अडविल्याने कालवा फुटून ऐन उन्हाळ्यात सुमारे १० लाख घन फूट इतके पाणी वाया गेले.

यात शासनाचे नुकसान झालेच, पण अचानक हे पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात आणि शेतात घुसल्याने पिके आडवी होऊन तसेच शेतकऱ्यांचेही शेत वाहून जाऊन शेतकऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत सांगोला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकी तेजीतच; सोयाबीन दर स्थिर, कापसाच्या दरात सुधारणा, हरभरा आवकेचा दबाव तर खरबूजाला उठाव

Solapur DPC Funds: डीपीसीचा निधी १५ दिवसांत द्या: खा प्रणिती शिंदे

Fishermen Crisis: मासेमारी बोटींचा किनाऱ्यावर मुक्काम

Social Awareness: वैज्ञानिक दृष्टिकोन हरवला तर लोकशाहीला धोका : जयदेव डोळे

Sand Auction Opposition: गिरणा नदीपात्रातील वाळू लिलावास विरोध

SCROLL FOR NEXT