Canal Burst : कालव्याला भगदाड, सिंचनाची बोंब

Crop Damage : शेतशिवारात अनेक ठिकाणी या मुख्य कालव्याला भगदाड पडून पाझर फुटल्याने शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
Crop Damage
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : ऊर्ध्व वर्धा पाटबंधारेकडून रब्बी हंगामातील पिकांसाठी दरवर्षी लाखो लिटर पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडले जाते. या पाण्यामुळे कालव्यालगत असलेल्या शेतीला रब्बी हंगामात शेतकरी हरभरा, गहू यांसह इतर पिकांना पाणी देतात. परंतु आता हेच पाणी तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे.

शेतशिवारात अनेक ठिकाणी या मुख्य कालव्याला भगदाड पडून पाझर फुटल्याने शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मोर्शीच्या नलदमयंती सागरातून संपूर्ण जिल्ह्यात कालव्याचे जाळे पसरले आहे. या कालव्यांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळते.

Crop Damage
Tembhu canal burst : टेंभू योजनेचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया

ज्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात चांगले उत्पन्न घेतो. परंतु याच कालव्याचे पाणी अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचे कारण ठरत आहे. तिवसा तालुक्यातील शेतशिवारातून गेलेल्या कालव्याला अनेक भागांत मोठ-मोठे भागदाड पडले असून पाझर फुटला आहे.

यामुळे दरवर्षी किती तरी शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक पडली असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कालव्याला जागोजागी भगदाड पडल्यामुळे कालव्याचे पाणी शेतात साचून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे.

Crop Damage
Dhom Canal Burst : धोमच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने नुकसान
मौजा भांबोरा येथे माझे मोठ्या कालव्याला लागून सात एकर शेत आहे. परंतु कालव्याच्या पाझरामुळे सात एकरांतील चार एकर शेत पडित आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत तक्रारी केल्या. परंतु अधिकारी फक्त येतात आणि पाहून जातात. अजूनपर्यंत कुठल्याही ठोस उपाययोजना केला नाही. मी एक अपंग शेतकरी आहे आणि शेतीवर आमचा उदरनिर्वाह आहे.
-दिनकर खंडार, भांबोरा, शेतकरी
शेतशिवारात ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड किंवा पाझर आहे. त्याच्या दुरुस्तीबाबत आम्ही अहवाल पाठविला आहे. तसेच कालव्याच्या पाझरामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
-आर. एम. लायचा उपविभागीय अभियंता, तिवसा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com