Market Bulletin: सोयाबीन दर स्थिरचालू आठवड्यात सोयाबीनचा भाव टिकून राहीला. सोमवारपासून सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसून आले. पण सरासरी भाव काहिसा स्थिर होता. आजही बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक कमी कमीच राहीली. पुढील काळातही सोयाबीनची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसाच्या दरात सुधारणागेले आठवडाभार कापसाच्या भावात काहिशी सुधारणा दिसून आली आहे. सीसीआयने कापूस खरेदीचा भाव चालू आठवड्यात खंडीमागे १५०० रुपयाने वाढवला आहे. कापसाला उठाव असला तरी बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. कापसाला खुल्या बाजारात सरासरी ८ हजार ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भवात सुधारणा झाली आहे. त्यामुळे देशात कापसाचा भाव टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..US Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार.हरभरा आवकेचा दबावदेशातील बाजारात हरभऱ्याची आवक सध्या चांगली सुरु आहे. भावावर आवकेचा दबाव असल्याने सध्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या हरभऱ्याला बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील हरभऱ्याची आवक चांगली सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ.खरबूजाला उठावखरबुजाला सध्या चांगला उठाव आहे. मागील काही दिवसांमध्ये बाजारातली खरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. पाऊस आणि गारपीटीचाही तडाखा खरबूज पिकाला बसला आहे. यामुळे खरबुजाच्या आवकेवर परिणाम होत आहे. सध्या बाजारात खरबूज प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे खरबुजाला उठाव मिळत आहे. पुढील काळात खरबुजाला मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खरबुजाचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..सरकी तेजीतदेशातील बाजारात मागील काही महीनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळत आहे. सध्या सरकी बाजारात ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होत आहे. त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.