Fish Shortage: डहाणू तालुक्यात वातावरणातील अनियमित बदल आणि इंधन दरवाढीमुळे माशांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. या संकटाने मच्छीमार व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून, अनेक मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. कधी थंडी, तर कधी कडक उन्हामुळे समुद्रातील परिस्थिती बदलली आहे. या बदलांचा थेट परिणाम हा माशांच्या संख्येवर झाला आहे. समुद्रात दूरवर जाऊनही मासे मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, दांडी, अर्नाळा, डहाणू खाडी तसेच उंबरगाव परिसरातील अनेक बोटी किनाऱ्यावरच उभ्या असल्याचे मच्छीमार सुनील पारधी यांनी सांगितले..Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर.आर्थिक संकटअनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. बोटींवरील खलाशी, मासे वाहतूक करणारे तसेच गावोगावी टोपलीतून मासे विकणारे छोटे विक्रेत्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, दहा दिवसांपासून मासेमारी ठप्प असल्याने आर्थिक संकट ओढवले आहे..Export Crisis: माल वाहतूक महागली.बाजारपेठा ओसइंधन दरवाढीमुळे खर्च वाढलेला असताना, माशांच्या अभावामुळे मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. खोल समुद्रात जाऊन रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने अनेकांनी मासेमारीसाठी जाणे टाळले आहे. यामुळे संपूर्ण साखळीवर परिणाम झाला आहे. डहाणूत मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध नसल्याने बाजारपेठा ओस पडल्या असून, केवळ कमी प्रमाणात लहान मासेच विक्रीस येत आहेत..ग्राहकांना आर्थिक फटकापापलेट, दाढा, घोळ, सरंगासारखे मोठे मासे विक्रीस येत होते. मात्र, सध्या लहान पापलेट, मांदेली, कोळंबी आदी माशांवरच बाजार अवलंबून आहे, तर काही मच्छीमार गुजरातच्या उंबरगाव, वापी येथून मासे खरेदी करून स्थानिक बाजारात विक्री करत आहेत. मात्र, त्याचे भाव जास्त असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे..अनेक दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने बोटी समुद्रात जात नाहीत. उदरनिर्वाहासाठी आम्हाला गुजरातमधून मासे आणून विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भावही वाढले असल्याने खवय्यांची निराशा होणार आहे.- अभय पागधरे, मच्छीमार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.