Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : तेलंगणा सरकारने केलं भातासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर; महाराष्ट्रातील भात उत्पादक मात्र हवालदिल

Agriculture News : तेलंगणा राज्य सरकारनं खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलाय.

Dhananjay Sanap

Telangana News : तेलंगणा राज्य सरकारनं खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. सोमवारी (ता.२०) मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीनंतर पी एस रेड्डी यांनी निर्णयाची माहिती माध्यमांना दिली.

तेलंगणा राज्य सरकारने रब्बी हंगामातील भात पिकांची किमान आधारभूत किमतीने म्हणजेच हमीभावाने ३६ लाख मेट्रिक टन खरेदी केली आहे, असा दावाही रेड्डी यांनी केला. तसेच तेलंगणा सरकारने खरीप भात लागवडीसाठी बियाणे आणि खतांचं नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

राज्य सरकार रब्बी हंगामातील तांदूळ खरेदी करणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. परंतु अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असं रेड्डी यांनी सांगितलं. ते म्हणाले, "राज्य सरकारने हमीभावाने भात खरेदी केली आहे. खरेदी रक्कम तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. तसेच राज्य सरकारने राज्यातील संपूर्ण तांदूळ हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे." असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

आकडेवारी काय सांगते?

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार तेलंगणा सरकारने आत्तापर्यंत २७.६१ लाख टन भात खरेदी केली आहे. सरकारचे खरेदीची उद्दिष्ट ५० लाख टनाचे होते. मात्र शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात भात विक्रीला पसंती दिली. कारण सरकारच्या खरेदी भावाच्या तुलनेत खुल्या बाजारात प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये अधिक भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात भात विक्री केल्याचं व्यापारी सांगतात.

महाराष्ट्रात भात उत्पादक हवालदिल

महाराष्ट्रातील भात उत्पादक पट्ट्यात रब्बी भातची खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागलेत. परंतु निवडणुकांच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात मागील दोन वर्षांचा भात खरेदी बोनस शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेत.

रेड्डींचं आश्वासन

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी तांदूळ खरेदीत राज्य सरकार शेतकऱ्यांना फसवणार नाही, असं जाहीर आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बोनसची आशा होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT