Dr. Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Cotton Cultivation : सेंद्रिय कापूस लागवडीचे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित व्हावे

Cotton Crop : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सेंद्रिय शेती संशोधन संस्था (फिबल) स्वित्झर्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंद्रिय कापूस-भविष्यातील वाटचाल’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली.

 गोपाल हागे

Akola News : ‘‘बदलत्या जागतिक हवामानाच्या आणि स्पर्धेच्या परिस्थितीत भारतीय शेतकरी संपन्न होण्यासाठी शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्य करणाऱ्या संस्थांसह प्रशासकीय विभागांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे. सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवडीचे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित व्हावे,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सेंद्रिय शेती संशोधन संस्था (फिबल) स्वित्झर्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंद्रिय कापूस-भविष्यातील वाटचाल’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली.

या वेळी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र वाघ (राहुरी), ‘फीबल’चे शास्त्रज्ञ डॉ. तनय जोशी, डॉ. आदिनाथ पसलावार उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘जागतिक बाजारपेठेत आता रसायनविरहित सेंद्रिय अथवा नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतीमालाला प्रचंड वाव आहे. आरोग्यदायी आणि फायदेशीर अन्नधान्य, भाजीपाला, फळ पिकांसह नगदी पिकांचे सुद्धा उत्पादन तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध झाले आहे. आत्मनिर्भर ग्रामव्यवस्थेसाठी शेतकरी- संशोधक- शासकीय विभाग आणि राज्यकर्त्यांनी एकात्मिक पद्धतीने कार्य करण्याची गरज आहे.’’

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद (नागपूर) म्हणाले, ‘‘विदर्भाच्या जमिनीचा, हवामानाचा आणि पीक पद्धतीचा विचार करता कपाशीसारख्या नगदी पिकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदर्भीय शेतीला स्थैर्य देण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवडीचे तंत्रज्ञान आत्मसात करीत त्याचा प्रभावी अवलंब करावा.’’

‘फिबल’च्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील भागधारक व्यक्ती, संस्था आणि समूहांचे प्रतिनिधी, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे शास्त्रज्ञ, महाबीज, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT