Organic Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Radio Kisan Din: परमानंद मोटवानी यांच्या शेतामध्ये रेडिओ किसान दिन साजरा

कोरोना काळात संपूर्ण देश बंद असताना केवळ कृषी क्षेत्र अखंडपणे सुरू होते, अशी भावना कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

Team Agrowon

Akola News : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत नवतंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम नेहमीच आकाशवाणीने केले आहे.

शेतकऱ्यांची आकाशवाणीप्रती असणारी बांधिलकी जपत अकोला आकाशवाणी केंद्राच्या वतीने प्रयोगशील शेतकरी परमानंद मोटवानी यांच्या सराळा येथील शेतामध्ये रेडिओ किसान दिन (Kisan Din)घेण्यात आला. या वेळी शेतकरी मार्गदर्शन व सन्मान सोहळा झाला.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकाचे उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे व शेतीमधे रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक शेतीचा प्रयोग करणे ही त्रिसूत्री शेतीला समृद्ध करणारी आहे, असे प्रतिपादन सोहळ्याचे उद्‍घाटक असलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यानी केले.

कोरोना काळात संपूर्ण देश बंद असताना केवळ कृषी क्षेत्र अखंडपणे सुरू होते, अशी भावना कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत सरपंच वसंतराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्याला स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशू विज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. नम्रता वाघमारे, तंत्र अधिकारी ज्योती चोरे यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी आकाशवाणी कार्यालय प्रमुख हेमंत सीडाम, कार्यक्रम प्रमुख विजय दळवी, कार्यक्रम अधिकारी देविदास पारखी, कृषी कार्यक्रम प्रसारण अधिकारी सूरज गोळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

नवतंत्रज्ञान, जैविक शेती, फळबाग लागवडीसह कृषी क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पल्हाडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT