Animal Census Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Census : पशुगणनेला तांत्रिक अडचण; अॅप रिफ्रेशची डोकेदुखी

Animal Census App : दर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप कामच करीत नसल्याने मोहीम सुरू होण्याआधीच थांबविण्यात आली आहे.

Team Agrowon

Chandrapur News : दर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप कामच करीत नसल्याने मोहीम सुरू होण्याआधीच थांबविण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून पशुगणनेचे काम सुरू होणार होते. मात्र आज वीस दिवसांचा काळ लोटला तरी पशुगणनेला सुरुवात झाली नाही.

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दर पाच वर्षांनी पशुगणना होते. एक सप्टेंबरपासून राज्यभरात पशुगणनेचे काम सुरू होणार होते. २०१९ रोजी करण्यात आलेली पशुगणना टॅबच्या मदतीने करण्यात आली होती. आता त्यापुढे एक पाऊल विभागाने टाकले आहे. २१व्या पशुगणनेसाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

या डिजिटल पद्धतीचा वापर करून पशुगणना करण्यात येणार आहे. पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या अॅपद्वारे ऑगस्ट महिन्यात प्रयोगिक तत्त्वावर काही ठिकाणी पशुगणना करण्यात आली होती.

त्यादरम्यान नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आली. याचदरम्यान पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप कामच करीत नसल्याचे समोर आले. विकसित करण्यात आलेले अॅप रिफ्रेश होत नसल्याने एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पशुगणनेचे काम लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ७.५२ लाख जनावरे

२०१९ रोजी जिल्ह्यात पशुगणना करण्यात आली. या गणनेनुसार जिल्ह्यात ७ लाख ५२ हजार २८६ जनावरे आहेत. त्यात गायवर्गीय जनावरे ३ लाख ९५ हजार ९१६, म्हशीवर्गीय जनावरे ६४ हजार ३८, शेळ्या २ लाख ४० हजार २८०, डुकरे १५५६ आणि घोडे १३ आहेत. हा आकडा पुन्हा वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT