Dr. Arjun Gunde Agrowon
ॲग्रो विशेष

Water Tax : शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी करवसुली गरजेची

Dr. Arjun Gunde : शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी नियमित पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटांकडून पाणीपट्टी वसुलीसारखा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : जलजीवन मिशन व माझी वसुंधरा अभियान या दोन्ही योजना लोकसहभागाच्या असून यामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी नियमित पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटांकडून पाणीपट्टी वसुलीसारखा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. गुंडे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. गुंडे यांनी, पूर्ण झालेली पाणीपुरवठा योजना ताब्यात घेताना गावाने सर्व उपायाबाबत व्यवस्थित माहिती घेऊन व खात्री करूनच योजना ताब्यात घ्यावी. तसेच किमान एक महिना ठेकेदाराकरून योजनेची पूर्व चाचणी करून घ्यावी, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सर्व घटकांबाबत अवगत करावे. पाणीपुरवठा योजना पूर्ण होत असताना त्यासाठी किती पाणीपट्टी लागणार आहे याचाही अभ्यास करणे आवश्यक असल्याचे या वेळी सांगितले.

प्रास्ताविकात बोलताना जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी जलजीवन मिशन व माझी वसुंधरा अभियान याबाबत तसेच कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी जलजीवन मिशनच्या कामाबाबत माहिती दिली. जलजीवन मिशनअंतर्गत जिह्यात घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील तांत्रिक समन्वयक शिवाजी सांगळे यांनी माझी वसुंधरा अभियानाबाबत माहिती देताना दस्तऐवज कसे तयार करावे, माहिती कशी भरावी याबाबत मार्गदर्शक केले. श्रीकांत सोनवणे यांनी जलसंधारण, देखभाल दुरुस्ती, पाणी बचत, पाण्याविषयक जनजागृती याबाबत मार्गदर्शक केले.

या वेळी कार्यक्रमास गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता, सरपंच, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे डेटा ऍन्ट्री ऑपरेटर, ग्राम स्वच्छता समिती सदस्य आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ विरोधासाठी मोहोळमध्ये ‘रास्ता रोको’

Shaktipeeth Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात महिलांनी अडवला रस्ता

Food Safety First: भेसळयुक्त अन्न रोखण्यासाठी २० जण तैनात

Mixed Cropping: मिश्र पीक पद्धतीचा अंगीकार करावा 

VIP Darshan: पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करा

SCROLL FOR NEXT