Mahareshim Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Cultivation : ११०० एकर तुती लागवड नोंदणीचा लक्ष्यांक

Sericulture : येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये रेशीम रथाद्वारे व्यापक मोहीम राबवून प्रचार व प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यासाठी २०२५-२६ करिता रेशीम विभागास ३५० एकर, कृषी विभागास ४०० एकर व जिल्हा परिषद विभागास ३५० एकर असा एकूण ११०० एकर तुती लागवड नोंदणीचा लक्ष्यांक शासनाकडून देण्यात आला आहे.

रेशीम शेती करणेसाठी योग्य ते विनामुल्य तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पंन्न वाढविणेसाठी विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी दिली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडी दाखवून शुक्रवारी (ता. १७) सुरुवात करण्यात आली.

येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये रेशीम रथाद्वारे व्यापक मोहीम राबवून प्रचार व प्रसिद्धी करून शेतकऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे, क्षेत्रिय अधिकारी बी. बी. जायभाये, लेखाधिकारी पी. के. चौधरी उपस्थित होते.

इच्छुकांनी संपर्क साधावा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत एक एकर रेशीम प्रकल्पासाठी तीन वर्षांमध्ये तुती लागवड व जोपासनेसाठी ६८२ मनुष्य दिवस व कीटक संगोपनगृह बांधकामासाठी २१३ मनुष्य दिवस असे एकूण ८९५ मनुष्य दिवसांची मजुरी २ लाख ६५ हजार ८१५ रुपये अकुशल घटकाअंतर्गत लाभार्थ्याला मस्टरद्वारे अदा केली जाते.

त्याबरोबरच कीटक संगोपन साहित्य व कीटक संगोपंगृह बांधकाम साहित्य खरेदीसाठी कुशल घटकांतर्गत १ लाख ५३ हजार रुपये अदा करण्यात येतात. योजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण ४ लाख १८ हजार ८१५ रुपये लाभ असून लाभार्थ्यांनी स्वतः मजूर म्हणून स्वतःच्या शेतात काम करणे आवश्यक आहे.

मनरेगा योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ या योजनेतून तुती लागवड, ठिबक सिंचन सुविधा, कीटक संगोपनगृह बांधकाम तसेच कीटक संगोपन साहित्य खरेदीसाठी रक्कम रूपये ३ लाख ७५ हजार अनुदान दिले जाते. तुती लागवडीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. डेंगळे यांनी केले आहे.

रोजगाराची प्रचंड क्षमता असलेल्या रेशीम उद्योगाला जिल्ह्यातील हवामान पोषक आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ या कालावधीत रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Multi Crop Farming: जोखीम कमी करणारे चार पीक पद्धतीचे तंत्र

Potato Planter Machine: ट्रॅक्टरचलित बटाटा लागवड यंत्र

Vermicompost Briquettes: व्हर्मी कंपोस्ट, डीएपी खताचेही तयार होणार ब्रिकेट

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चाची किंमत निश्चित

Farm Loan Waiver Controversy: कृषी कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक

SCROLL FOR NEXT