Maharashtra Revenue Department Decision: राज्यात गौण खनिज आणि वाळूमाफियांसोबत संगनमत करून त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि माफियांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने विशेष कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत गुरुवारी (ता. २५) दिली..गडचिरोली येथे अवैध गौणखनिज तस्करी करणाऱ्यांनी नायब तहसीलदारावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत नाना पटोले, भास्कर जाधव यांनी उपस्थित केले. त्यावर चर्चेदरम्यान महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली..Farmer Subsidy: 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार'साठी १२५ कोटी निधी मंजूर, ३२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान .शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘एमपीडीए’ सारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वाळू, गौण खनिज तस्करी आणि या क्षेत्रातील तस्कर आणि अधिकाऱ्यांमधील संगनमताचा विषय असून ही समस्या समूळ नष्ट करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानुसार अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यासाठी, तसेच प्रकरणांवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र कृती दलाची स्थापना करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले..Satbara Ferfar Scam: ७/१२ उताऱ्यांत बेकायदेशीर फेरफार, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक; ४२४ प्रकरणे उघडकीस- बावनकुळे.महाराष्ट्रात महसूल, अधिकाऱ्यांना कारवाई दरम्यान मारहाण करणे, अंगावर वाहने घालणे, आणि शासकीय वाहनांची तोडफोड करणे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत..राज्यात ‘ईटीएस’ प्रणालीराज्यातील अवैध उत्खननाला चाप लावण्यासाठी आता संपूर्ण राज्यात गौण खनिज आणि वाळूसाठी ‘ईटीएस’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून केवळ चालू काळातीलच नाही, तर मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळात राज्यात जिथे कुठे अवैध उत्खनन झाले असेल किंवा होत असेल, त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.