Sugarcane Seaosn  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : यंदा १८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing : गळीत हंगाम २०२३-२४ साठी कारखाना कार्यक्षेत्रात ३५ हजार ६८६.८५ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. हेक्टरी ६० टन प्रमाणे २१.४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल.

Team Agrowon

Jalna News : गळीत हंगाम २०२३-२४ साठी कारखाना कार्यक्षेत्रात ३५ हजार ६८६.८५ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. हेक्टरी ६० टन प्रमाणे २१.४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल.

यापैकी कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगरकडे १३‌.५० लाख टन व युनिट नं.२ (सागर) तीर्थपुरीकडे ४.५० लाख असा एकूण १८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी केले.

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., अंकुशनगर, ता. अंबड येथील युनिट नं.१ अंकुशनगर, युनिट नं.२ (सागर) तीर्थपुरी येथील ऊस गव्हाण पूजन समारंभ गुरुवारी (ता. २६) पार पडला. त्या वेळी श्री. टोपे बोलत होते.

या वर्षी कारखान्याचे इतिहासात प्रथमच ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार व कारखान्याचे कर्मचाऱ्यांच्या हस्ते गव्हाणपूजन करण्यात आले. श्री. टोपे म्हणाले, की २०२२-२३ हंगामात युनिट नं.१ अंकुशनगरकडे ७ लाख ६४ हजार टन व युनिट नं‌.२ (सागर) तीर्थपुरीकडे ५ लाख १४ हजार ७२९ टन ऊसगाळप झाले.

गळीत केलेल्या उसास २७०० रुपये प्रति टन प्रमाणे अंतिम ऊसदर निश्‍चित केला आहे. यापैकी २६०० रुपये अदा केला असून, उर्वरित १०० रुपये १ नोव्हेंबरपासून अदा करण्यात येणार आहेत. कार्यक्षेत्रातील इतर साखर कारखाने व गुऱ्हाळ मिळून अंदाजे ३.४१ लाख टन उसाची परस्पर विल्हेवाट होईल असा अंदाज आहे.

१ नोव्हेंबरपासून ऊस गळितास सुरुवात करण्यात येणार आहे. हंगामामध्ये गळितास येणाऱ्या उसास मराठवाड्यातील कारखान्यांचे बरोबरीने अधिकचा ऊस भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी उपाध्यक्ष उत्तमराव पवार, व्यवस्थापकीय संचालक बी. टी. पावसे, कार्यकारी संचालक दिलीप पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT