Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment Scheme : लाडक्या बहिणींसाठी ‘ताराराणी महिला कर्ज योजना’

Tararani Women Loan Scheme : लाडक्या बहिणींसाठी जिल्हा बॅंकेच्या वतीने ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना सुरू केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Team Agrowon

Kolhapur News : लाडक्या बहिणींसाठी जिल्हा बॅंकेच्या वतीने ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना सुरू केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आर्थिक वार्षिक आढावा देताना त्यांनी जिल्हा बॅंकेच्या ठेवीत १५८९-५३ कोटींची वाढ झाली असून, ४५.७२ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजू आवळे, संचालक आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह संचालक उपस्थित होते. ‘‘ज्या लाडक्या बहिणींची खाती जिल्हा बॅंकेत आहेत, अशा महिलांना व्यवसायासाठी वैयक्तिक तीस हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.

लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये खात्यावर जमा झाल्यानंतर त्यातून मासिक हप्ता ९६८ रुपयांचा कपात करून घेतला जाईल. कर्जाची मुदत ३६ महिने असेल. दसादशे १० टक्के इतका व्याजदर असेल.

यासाठी कर्ज मागणी अर्ज, कर्जदार आणि दोन जामीनदारांची छायाचित्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, मागील महिन्याच्या वीज बिलाची आवश्‍यकता आहे. बॅंकेत एक लाख ३८ हजार १५८ लाभार्थी महिला आहेत. त्या सर्वांना हा लाभ घेता येईल,’’ असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.

पाच किंवा अधिक महिलांनी एकत्रित व्यवसाय केल्यास ‘प्रोजेक्ट फायनान्स’अंतर्गत कर्ज पुरवठा करणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रणजितसिंह पाटील, प्रताप उर्फ भैया माने, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, दिलीप लोखंडे, आणि आय. बी. मुन्शी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी

Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची

Farmer Support: अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

SCROLL FOR NEXT