Tambera Disease Sugrcane Agrowon
ॲग्रो विशेष

Tambera Disease Sugrcane : उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना चिंता

Sugarcane Crop : उसाची वाढ खुंटली असून ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Production Decrease : मागच्या वर्षी पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली होती तर काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान यंदा अतिपावसाने पिकांवर रोगराईचा परिणाम दिसून येत आहे. जून आणि जुलै दरम्यान पावसाचे पोषक वातावरण असल्याने ऊस पीक जोमदार आले होते. परंतु जुलैअखेरीस अतिृष्टीमुळे महापूर व त्यानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे.

सध्या सततचा पाऊस आणि प्रतिकूल वातावणामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी उसाची वाढ खुंटली असून ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा उन्हाळ्यात उष्ण तापमान आणि कासारी नदीला मुबलक पाण्यामुळे ऊस पीक जोमदार आले. मात्र जुलैच्या मध्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला. अतिृष्टीमुळे कासारी नदीला महापूर आला. नदीकाठच्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापुरानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला.

परंतु जुलै व ऑगस्ट महिन्यात पन्हाळा तालुक्यात बहुतांश भागात सतत पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये पुन्हा पावसाची संततधार कायम आहे. यामुळे सर्वच पिकांवर रोगराई वाढली असून प्रामुख्याने ९२००५ या जातीच्या उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसू लागला आहे. तांबेरा किडीमुळे उसाची पाने तांबूस फिकट होऊन जीर्ण होतात. परिणामी उसाची वाढ खुंटून ऊस उत्पादनात घट होते. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

महापुराच्या तडाख्यात नदीकाठावरील उसाचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे शिवारात पाणी साचून राहिले आहे. यामुळें उसावर तांबेरा रोग वाढला आहे. उसाची वाढ खुंटली असून उत्पादन घटण्याची शक्यता असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT