Sugarcane Crop agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crop : नदीकाठच्या उसावर तांबेरा, महापुरामुळे ऊस पिकावर गंभीर परिणाम

Tambera Sugarcane Crop : पाने पिवळी पडल्याने तो वाळल्यासारखा दिसत आहे. यामुळे पाने मृतावस्थेत जाऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर होतो.

sandeep Shirguppe

Sugarcane Impact Tambera : अतिप्रमाणात पाऊस आणि दमट हवामान यामुळे जिल्ह्यातील नदी काठावर असलेल्या ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव विळखा बसला आहे. महापुरात बुडालेली पिकांची पाने पिवळी पडली असून त्याचा उसाची वाढ खुंटली आहे. वाढलेल्या उसातून प्रतिबंधक औषध फवारणी करणे अशक्य असल्याने कारखान्यांनी ड्रोणचा पुरवठा करून एकात्मिक पद्धतीने फवारणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तीन वेळा नद्यांनी पात्र ओलांडल्याने पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. पावसाने शेतात पाणी तुंबून उसाची मुळे कुजणे तसेच सतत ढगाळ आणि दमट हवामानामुळे तांबेरा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षीही पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे नदीकाठचा हजारो हेक्टर ऊस तांबेरा रोगाला बळी पडला आहे.

पाने पिवळी पडल्याने तो वाळल्यासारखा दिसत आहे. यामुळे पाने मृतावस्थेत जाऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर होतो. ऊस हे शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे. त्यावर आधारित वर्षभराचे प्रापंचिक नियोजन अवलंबून असते.

उसाची लागवड, मशागत, खते, मजुरी हा खर्च शेतकरी सेवा संस्थेतून पीक कर्ज घेऊन करत असतो. त्यामुळे अपेक्षीत उत्पादन न मिळाल्यास त्याला कर्जबाजारी होण्याची वेळ येते. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून हवेत उष्मा वाढला आहे.

उसाची उंची वाढलेली असून खोडापासून पानांनी सऱ्या व्यापल्या आहेत. या स्थितीत तांबेरा प्रतिबंधक औषध फवारणी करणे अशक्य आहे. त्यासाठी कारखान्यांनी ड्रोन पुरवणे आणि शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने औषध फवारणी करणे हाच योग्य उपाय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT