Arrest In Bribe Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe Arrest : तलाठ्याला वीस हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

Bribe News : वासुली (ता. खेड) येथील एका शेतकऱ्याकडे ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दिसण्यासाठी एका तलाठ्याने तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

Team Agrowon

Pune News : वासुली (ता. खेड) येथील एका शेतकऱ्याकडे ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दिसण्यासाठी एका तलाठ्याने तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. शेतकऱ्याने पंचासमक्ष वीस हजार रुपये लाच दिली.

याप्रकरणी तलाठी सतीश संपतराव पवार (वय ५२ वर्षे) याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायदा, कलम ७ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘एक एकोणतीस वर्षीय तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसत नसल्याने ऑनलाइन नाव दिसण्याकरता तलाठी सतीश पवार यांची तलाठी कार्यालयात वासुली येथे भेट घेतली.

पवार याने तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर याची पडताळणी पंचासमक्ष केली.

१७ मे २०२४ रोजी सतीश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीचा ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती वीस हजार रुपयांची लाच मागणी केली होती.

१० जून २०२४ रोजी सतीश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपयांची लाच रक्कम पंचासमक्ष वासुली येथील तलाठी कार्यालयात स्वीकारल्यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल त्यांना अटक करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT