Kolhapur Bribe Case : जमीन एन. ए. करण्यासाठी लाच घेताना महिला कारकूनवर कारवाई, कोल्हापुरातील घटना

Women Bribe Case Arrest : अश्विनी कारंडे हिला सापळा रचून एसीबीने पकडल्यानंतर कागल तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.
Kolhapur Bribe Case
Kolhapur Bribe Caseagrowon

Kagal Tehsil Kolhapur : कागल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी अतुल कारंडे हिला गौनखनिज भाडे कराराची जमीन एन.ए. करण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. अश्विनी कारंडे ही पूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून म्हणून काम करत होती. मागच्या काही काळात तीची कागल तहसील कार्यालयात बदली झाली होती. तीला सापळा रचून एसीबीने पकडल्यानंतर कागल तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजता कागल तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गौण खनिज खरेदी-विक्री व्यवसाय करण्यासाठी एका व्यावसायिकाने कागल तालुक्यात भाडे कराराने जमीन घेतली आहे. जमीन एन. ए. करण्यासाठी मूळ मालकाच्या नावाने तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. हे काम करून देण्यासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी कारंडे यांनी संबंधिताकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ३० हजार रुपयांची रक्कम घेऊन येण्यास अश्विनी कारंडेने संबंधित व्यावसायिकाला सांगितले.

या व्यावसायिकाने कारंडेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा केली. त्याप्रमाणे मंगळवारी तहसील कार्यालयात सापळा रचला. तहसील कार्यालयात सायंकाळी सव्वाचारला अश्विनी कारंडेला ३० हजार रुपये घेताना विभागातील अधिकाऱ्यांनी पकडले. त्यानंतर तिला कागल पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरकार नाळे यांनी ही कारवाई केली. पथकात पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील यांचाही समावेश होता. रात्री उशिरा या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते.

Kolhapur Bribe Case
Kolhapur Bribe Case : 'कुंपणच जेव्हा शेत खाते' जिल्हा भूमी अधीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी तसेच त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागितल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अशी तक्रार दिल्याने तुमचे कोणतेही शासकीय काम थांबत नाही.

- सरदार नाळे, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभांग, कोल्हापूर

'तहसील'चे धाबे दणाणले कारवाईमुळे कागल तहसील

कार्यालयात एकच खळबळ उडाली. अश्विनी कारंडेवर कारवाई झाल्याचे समजताच तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्षणात कार्यालय सोडले. काहींनी आवारातील उपहारगृहात थांबून कारवाईची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर घरचा रस्ता धरला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com