River Pollution agrowon
ॲग्रो विशेष

River Pollution : नीरा नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

Neera River Pollution : दूषित पाणी सोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई न केल्यास ४ फेब्रुवारीपासून अकलूजमधील साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत ठिया व थाळीनाद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Team Agrowon

Solapur News : अकलूज आणि पुरंदावडे गावच्या हद्दीत असलेल्या ओढ्यातून नीरा नदीत येणाऱ्या दूषित पाण्याची चौकशी करून दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी सोलापूर, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी सोलापूर, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दूषित पाणी सोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई न केल्यास ४ फेब्रुवारीपासून अकलूजमधील साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत ठिया व थाळीनाद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

माळशिरस तालुक्यातील शिवतेजनगर, प्रताप सिंह चौक, व्यंकट नगर, अकलाई नगर मार्गे ओढ्यातून थेट अकलूज मधील नीरा नदीत दूषित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठी दूषित पाण्याच्या दुर्गंधीमुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नदीकाठच्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दूषित पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पुरंदावडे ते इस्लामपूर रस्त्यावर असलेल्या पुरंदावडे हद्दीतील ओढ्यातून येणारे दूषित पाणी येळीव हद्दीत असलेल्या ओढ्यामध्ये येत असून दूषित पाण्याच्या वासामुळे पुरंदावडे गावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे व ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नदीच्या वड्याच्या जलप्रदूषणामुळे संगम होणाऱ्या पुढच्या सर्व नद्या व वड्याच्या काठावर असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुरंदावडे व अकलूजमधील नीरानदीत पाणी सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: विमा भरपाई वितरणाला वेग

Karhunnavi Festival: लोहारा तालुक्यात ‘कारहुन्नवी’ सणानिमित्त बळीराजाची पूजा

Kharif Sowing: लातूर-धाराशिवमध्ये पेरण्यांना वेग

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठा’स विरोध ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई : सतेज पाटील

Bison Gaur Crop Damage: जांभळी-कासारी खोऱ्यात गव्यांचा धुडगूस

SCROLL FOR NEXT