Takari Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ताकारी योजना पुन्हा सुरू; मुख्य कालवा वाहू लागला

Rajan Dawari : पाण्याची चिंता मिटली आहे. आवर्तन पूर्ण क्षमतेने व शेवटच्या भागात पोहोचेपर्यंत सुरूच राहील, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले.

Team Agrowon

Sangli News : सांगलीकडे पाणी जाण्यासाठी बंद करण्यात आलेले ताकारी योजनेचे पंप मंगळवारी (ता.६) सकाळी पुन्हा सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदले. पाण्याची चिंता मिटली आहे. आवर्तन पूर्ण क्षमतेने व शेवटच्या भागात पोहोचेपर्यंत सुरूच राहील, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले.

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील पाणी मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ताकारी योजनेचे या वर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन २२ जानेवारीला रात्रीपासून सुरू केले होते. आवर्तन सुरू झाल्याने सुमारे १८ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. कृष्णा नदीपात्र सांगलीजवळ उघडे पडून टंचाई निर्माण झाल्याने चार दिवसांपूर्वी ताकारी व टेंभू योजनेचे निम्मे पंप बंद करण्यात आले.

मुख्य कालवा आटला. साटपेवाडी बंधाऱ्यात आवश्यक पाणी पातळी मिळताच नऊ पंप सुरू करण्यात आले. यातून टप्पा क्रमांक ३ चे ३ व टप्पा क्रमांक ४ चे २ पंप सुरू करून सोनहिरा खोऱ्यासह तडसर परिसरांत पाणी सोडण्यात आले. सध्या टप्पा क्रमांक २ चे ९ पंप सुरू आहेत.

टप्पा क्रमांक ३ चे ३ पंप सुरू असल्याने वांगीसह पुढे वितरिका पूर्ण दाबाने चालत नाहीत. म्हणून टप्पा क्रमांक १ व २ चे ११ पंप सुरू केल्यास वितरिका पूर्ण क्षमतेने चालवावीत अशी मागणी होवू लागली आहे. ताकारी योजनेच्या वाट्याचे या वर्षीचे ३.६ टीएमसी पाणी अद्याप उचलणे बाकी आहे. चालू आवर्तन ३५ ते ४० दिवस देण्याचे नियोजन आहे.

ताकारी योजनेचे ९ पंप सुरू आहेत. पाणी मुख्य कालव्यातून ५० किलोमीटरपर्यंत सुरू आहे. गरजेनुसार आणखी २ पंप सुरू करून पाणी १४४ किलोमीटर (सोनी, ता. मिरज) वर लवकर पोहोचवले जाणार आहे.
राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT