Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : आंबा, काजू बागायतदारांचे १४ डिसेंबरला लाक्षणिक उपोषण

Mango Cashew Farmer : राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना राबविली. या योजनेचा लाभ दोन लाखांवरील आंबा, काजू बागायतदारांना मिळालेला नाही.

Team Agrowon

Sindhudurg News : कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, खावटी आणि मध्यम, अल्पधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार येत्या १४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना राबविली. या योजनेचा लाभ दोन लाखांवरील आंबा, काजू बागायतदारांना मिळालेला नाही. खावटी कर्जधारक अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.

सातत्याने त्यांना फसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार विविध पातळ्यांवर आंदोलने, उपोषण, निवेदने देत आहेत. मात्र हे प्रश्‍न अजूनही सुटलेले नाहीत.

त्यामुळे आता १४ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करणार आहेत. याबाबतचे निवेदन शुक्रवारी (ता. १) शेतकरी आम्नेल फर्नाडीस, संदीप देसाई, संतोष पेडणेकर, महेश चव्हाण, अर्जुन नाईक यांनी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांना दिले.

या वेळी सन २०२२-२३ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली. भात आणि सुपारी पिकांच्या नुकसानीसंदर्भात देखील त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचे चर्चेदरम्यान लक्ष वेधले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT