Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Shortage News : ऊस टंचाईवर कारखान्याला आता गोड ज्वारीचा पर्याय

Sugarcane Season 2023 : ‘नॅचरल शुगर’च्या २२ व्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन रविवारी (ता. १५) कारखान्याचे संचालक राजपाल माने आणि अंजली माने यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री. ठोंबरे होते.

Team Agrowon

Dharashiv News : ‘‘ऊस टंचाईच्या समस्येवर आता साखर कारखान्याला गोड ज्वारीचा पर्याय आहे. इथेनॉल निर्मितीसाठी शेतकऱ्यांना हा एक अर्थिक पर्याय आहे,’’ अशी माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

‘नॅचरल शुगर’च्या २२ व्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन रविवारी (ता. १५) कारखान्याचे संचालक राजपाल माने आणि अंजली माने यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री. ठोंबरे होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्री. ठोंबरे म्हणाले, ‘‘‘नॅचरल शुगर’द्वारे विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे.

साखर कारखान्यांना भविष्यकाळात भेडसावणाऱ्या ऊस टंचाईच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांसाठी गोड ज्वारीचा पेरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात करून त्याचा ईथेनॉल निर्मितीसाठी वापर करणे, उत्पादन प्रतिएकर २० ते २२ टन मिळविणे असा उद्देश राहील.

गोड ज्वारीपासून उत्पादित ताटे कारखाना प्रतिटन दोन हजार रुपये प्रमाणे खरेदी करेल. अल्पावधित शेतीमधून जादा उत्पादन म्हणजेच हरभऱ्यापेक्षा जादा व हमखास नफा मिळवून देणारे हे गोड ज्वारीचे पीक आहे.’’

युपीएल, अॅडव्हांटा कंपनीने गोड ज्वारी संदर्भातील त्यांनी विकसित केलेल्या विविध जातींचे प्रदर्शन केले. या वेळी पांडुरंग पाटील यांनी गोड ज्वारीबाबत माहिती दिली. पांडूरंग आवाड प्रास्ताविक केले. संभाजी रेड्डी यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

Dairy Business: दुग्ध व्यवसायात तरुणांना मोठी संधी : डॉ. भिकाणे

Rainfall Deficit: पावसाने बळिराजाला आणले संकटात

Paddy Transplanting Practical: त्र्यंबकेश्वर तालुक्यात यांत्रिक भात लागवड प्रात्यक्षिके

SCROLL FOR NEXT