Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’चे कारखान्यांसमोर ‘ढोल बजाओ’

Farmers Protest : गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २) जिल्ह्यातील विविध कारखान्यांवर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Kolhapur News : गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २) जिल्ह्यातील विविध कारखान्यांवर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

दत्त, गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद, राजाराम आदी साखर कारखान्यांसमोर ढोल बजाओ आंदोलन करून ४०० रुपयांचा हप्ता तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.

शिरोळ येथे सावकर मादनाईक म्हणाले, की गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत.

साखर कारखान्यांना यामधून चांगला नफा मिळाला आहे. वाढलेल्या महागाईमुळे कीटकनाशके, खते, बी-बियाणे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या या महागाईमुळे शेतकयांचे कंबरडे मोडले आहे.

दसरा आणि दिवाळी आता तोंडावर आले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे कारखान्यांकडून तातडीने ४०० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा.

या बाबत कारखान्यांना सोमवारपर्यंत (ता. २) मुदत देण्यात आली होती. आजअखेर कारखान्यांनी दुसरा हप्ता जमा न केल्याने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करून आपणास जागे करण्यात येत आहे. मंगळवारपासून (ता. ३) कारखान्यांतून बाहेर पडणारी साखर वाहतूक अडवून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

तसेच दसऱ्याच्या अगोदर आमच्या हक्काचे ४०० रुपये प्रतिटन न दिल्यास तुमची दिवाळी गोड होणार नाही, असा इशारा या वेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

या वेळी विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, बंडू पाटील, भिमगौंडा पाटील, सागर मादनाईक, वासू भोजणे, विश्वास बालिघाटे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT