Sugar Trasport Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Transport : ‘स्वाभिमानी’ने हातकणंगलेत साखर वाहतूक रोखली

Swabhimani Shetkari Sanghatana : गेल्‍या हंगामात गाळप झालेल्या उसास प्रति टन चारशे रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ३) नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याची साखर वाहतूक रोखली.

Team Agrowon

Kolhapur News : गेल्‍या हंगामात गाळप झालेल्या उसास प्रति टन चारशे रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ३) नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याची साखर वाहतूक रोखली.

कारखान्यातून साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून कार्यकर्त्यांनी ट्रक अडवले. जोपर्यंत आमची हक्काची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत आम्ही साखर वाहतूक करू देणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेत साखर भरलेला ट्रक परत कारखान्यास नेण्‍यास भाग पाडला.

या वेळी घोषणाबाजी करून चारशे रुपये देण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (ता. २) संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोपर्यंत ही रक्कम मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याची साखर वाहतूक करू देणार नाही, असा इशारा दिला होता.

शरद सहकारी साखर कारखान्याला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता दिल्याखेरीज साखर वाहतूक सुरू नये याबाबत निवेदन सोमवारी देण्यात आले होते. तरीही मंगळवारी कारखान्यातून साखर वाहतूक करण्यात आली.

या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते धनाजी पाटील, शिवाजी पाटील, आण्णा मगदूम, सुरेश शिर्के, महावीर चौगुले, एकनाथ खाडे, पंकज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणा देत कारखान्यातून बाहेर पडलेली गाडी अडवून साखर वाहतूक रोखून धरली. जे कारखाने इथून पुढे साखर वाहतूक करतील त्या सर्व कारखान्यांची साखर अडवण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT