Shiwani Water Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Shiwani Water Project : ‘शिवणी’च्या पाझर नियंत्रणासाठी स्वाभिमानी संघटना करणार आंदोलन

सोनगाव-कळमगाव प्रकल्पालगत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. यावर्षी पावसामुळे सदर प्रकल्प ६० ते ७० भरला.

Team Agrowon

Amravati News : शिवणी प्रकल्पाचे पाणी सोनगाव-कळमगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाझरत आहे. परिणामी गेल्या वर्षभरापासून शेतातील उभ्या पिकांची उत्पादकता (Crop Productivity) प्रभावित झाली आहे.

त्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी, सर्व्हेक्षण, पंचनामे (Crop Survey) करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई (Farmer Compensation) देण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे.

उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, चांदूररेल्वे तालुका अध्यक्ष प्रशांत शिरभाते, शहर प्रमुख दिनेश आमले, युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख मंगेश फाटे, स्वप्नील कोठे यांनी हे निवेदन दिले.

निवेदनानुसार, सोनगाव-कळमगाव प्रकल्पालगत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. यावर्षी पावसामुळे सदर प्रकल्प ६० ते ७० भरला. सदर प्रकल्पाचे पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाझरत आहे.

त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी व संत्रा बागांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी यंत्रणांनी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे.

यापूर्वी ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे. सात दिवसांत कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येणार असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi On Vote Chori : मत चोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केले गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे मागवले उत्तर

Rabbi Anudan GR: कोकणातील शेतकऱ्यांना २९ कोटींचे रब्बी अनुदान मिळणार

Soybean MSP: उपबाजारपेठ तिर्थपुरीत शनिवारपासून सुरू होणार सोयाबीन हमीभाव केंद्र

Reflective Collar: पशुपालनामध्ये ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’चा वापर ठरतोय फायदेशीर

Land Acquisition: जमिनीचे शासकीय दर अद्ययावत करूनच भूसंपादन करा

SCROLL FOR NEXT