Swabhimani Shetkari Sanghatna Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurances : पीकविम्याच्या अग्रिम रकमेसाठी स्वाभिमानीचा रास्ता रोको

Swabhimani Shetkari Sanghatna Protest : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम रक्कम तत्काळ अदा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता. २६) परभणी येथे रास्तो रोको आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम रक्कम तत्काळ अदा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता. २६) परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील खानाापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. जुलै-ऑगस्टमधील पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण परभणी जिल्हा अग्रिम पीकविम्यासाठी पात्र करावा.

अग्रिम पीकविम्याची रक्कम २ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. कमी पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पेरणी होणे शक्य नाही. त्यामुळे जनावरांचा व अन्नधान्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे.

पेरणीसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोडे, पंडित भोसले, उत्तम माने, बालकिशन चव्हाण, प्रसाद गरुड, उद्धव जवंजाळ, माऊली शिंदे, विकास भोपळे, हनुमान आमले आदींनी या वेळी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT