ॲग्रो विशेष

Soyabean Rate : सोयाबीन दर पडल्यानंतर 'स्वाभिमानी' आक्रमक, मालेगाव शहरात कडकडीत बंद

Swabhimani Shetkari sanghanta Protest : सोयबीनला प्रति क्विंटल ८ हजार रुपये भाव मिळावा, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळला.

Swapnil Shinde

Washim News : माॅन्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) ओढ दिल्याने खरीप हंगामातील (Kharif crop) पिकांचा त्याचा फटका बसला आहे. तसेच सध्या सोयाबीन काढणीची काम असून बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची (soyabean) आवक वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर पडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये दर मिळण्यासाठी आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

'ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. एका बाजूला दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे बाजारात शेती पिकांचे दर पडले आहे. सध्या खरीप पिकांची काढणीचे कामे सुरू आहेत. अशात सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारने खरीप हंगामात सोयाबीनचा एमएसपी ४६०० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. परंतु बाजारात तेवढा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही.

पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ३८०० ते ४१०० रुपये भाव मिळत आहे. या किमतीत शेतकर्‍यांना नफा तर मिळत नाहीच पण त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोयाबीनला किमान ८ हजार रुपये भाव देण्यात यावा, पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, यलो मोझ्याकच्या तक्रारी ग्राह्य धरून संपूर्ण पीक विमा मंजूर करा या मागणीसाठी बंदची हाक दिली होती. त्याला मालेगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी झाले होते.

राज्यात खरिपातील नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. सरकारच्या धोरणांवर बाजारात नव्याने आलेले सोयाबीन विकले जात असताना 3800 ते 4100 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांचा खर्च जेमतेमच भागणार असेल आणि शेतीतून नफा मिळणार नसेल, तर शेती करून काय फायदा?
दामुअण्णा इंगोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Prices : कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; आंध्र प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय

CM Annapurna Yojana: घरगुती वापरासाठी मिळणार दरवर्षी ३ मोफत गॅस सिलिंडर; महिलांसाठी राज्य सरकारची योजना

Kashmir Fruit Crisis: काश्मीरच्या फळ उत्पादकांचे मोठे नुकसान; जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद

Grass Selling: गवताच्या भाऱ्याचा आधार

Agrowon Podcast: आल्याच्या दरातील तेजी टिकून; कापसाचे भाव दबावातच, सोयाबीनचे दर स्थिरावले, लाल मिरचीची आवक मर्यादीत तर शेवग्याला चांगला उठाव

SCROLL FOR NEXT