Damodar Ingole  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा, सोयाबीनच्या मागण्यांसाठी करंजीमध्ये ‘स्वाभिमानी’चा मेळावा

Swabhimani Shetkari Sanghatana : सोयाबीनला ८ हजार रुपये दर मिळावा आणि पीकविम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात करंजी येथे सोयाबीन परिषद घेण्यात आली.

Team Agrowon

Akola News : सोयाबीनला ८ हजार रुपये दर मिळावा आणि पीकविम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात करंजी येथे सोयाबीन परिषद घेण्यात आली. या वेळी परिसरातील शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

श्री. इंगोले म्हणाले, ‘‘दिवाळीपूर्वी पीकविम्याची अग्रिम रक्कम न दिल्यास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी शेतकऱ्यांना घेऊन दिवाळी साजरी करू. देवेंद्र फडणवीस यांनी २०१३ मध्ये सोयाबीनला ६ हजार रुपये भाव मागितला होता. त्या भाषणाची क्लिप ऐकवत आता दहा वर्षांनंतर तरी सोयाबीनला भाव द्या,’’ अशी मागणी केली.

वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम रक्कम मंजूर झालेली असतानाही कंपनी द्यायला तयार नाही. जाणीवपूर्वक जिल्ह्याला टाळण्यात आले आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत असून कंपनी विरोधात रस्त्यावरही लढाई लढून दोन लाख शेतकऱ्यांना नाय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. सोयाबीनचे भाव पाडण्याचे षड्यंत्र केंद्र सरकारने केले असून, सोया डिओसी आणि पामतेलाची आयात मोठ्या प्रमाणात केली आहे.

महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना फटका देत शहरी मतदारांना खुश करीत आहे. वाढलेला उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान ८ हजार रुपये भाव मिळायला पाहिजे. पिवळा मोझॅकमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जावी. कृषी पंपाचा वीजपुरवठासुरळीत करण्यात यावा. दिवसा किमान आठ तास वीज द्यावी. या मागण्या सरकारने तातडीने सोडवण्याचीही मागणी त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT