Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : 'साहेब आमची दिवाळी नाही, उसाला दर द्या'; हसन मुश्रीफांना महिलांकडून खर्डा भाकरी देऊन भाऊबीज

Hasan Mushrif : स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खर्डा भाकरी देऊन ओवाळणी केली.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane News : मागच्या एक महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुसऱ्या हफ्ता ४०० रुपये आणि यंदाच्या गळीत हंगामातील ३ हजार ५०० रुपयेसाठी एल्गार पुकारल्याने विविध ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खर्डा भाकरी देऊन ओवाळणी केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार व कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनात तोडगा न काढल्याने व शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर गेली यामुळे दिपावली भाऊबीज निम्मीत्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देवून ओवाळणी केली.

यावेळी महिला आघाडीच्यावतीने पालकमंत्री मुश्रीफ यांना लवकरात लवकर ऊस दराचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

राजू शेट्टींसारखे नेते हवेत: हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ मागच्या दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राजू शेट्टी यांना तुमचा दत्ता सामंत करू अशी धमकी आली असेल तर ते चुकीचे आहे. शेट्टींसारखे नेते असले पाहिजेत तरच कारखानदार वळणावर राहणार आहेत. शेतकऱ्यांचा आवाज शेट्टी यांच्या माध्यमातून राहिला पाहीजे. असेही मुश्रीफ म्हणाले.

कारखानदारांनी मार्ग काढावा

मागील हंगामातील उसासाठी ४०० रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटना मागत आहे; पण कारखानदारांना ते परवडत नसल्याचे सांगत आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी चर्चेची दारे खुली असल्याचे सांगितले आहे. परंतु कारखानदार साखर कारखाने कर्जात असल्याचे कारण सांगत आहेत. परंतु यातून शेट्टी यांनी एक पाऊल मागे व कारखानदारांनी एक पाऊल पुढे टाकून मध्यमार्ग काढलाच पाहिजे.

दोन्ही घटकांनी सध्याच्या नैसर्गिक परिस्थिती नजरेसमोर ठेवली तर अगदी १५० ते २५० रुपयांदरम्यान दरावर तडजोड होऊन मार्ग काढता येईल, असे वाटते. कारखानदार व संघटनांनीही यासाठी लवचिक भूमिका घेणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT