Warna Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Warna Sugar Factory : वारणा सहकारी साखर कारखान्याकडून वारणा नदीत दूषित पाणी सोडल्याचा संशय; प्रदूषण मंडळाकडून कार्यवाही

Kolhapur Sangli River Pollution : सांगली आणि कोल्हापूर कार्यालयाच्या पथकाने नदीच्या दोन्ही बाजूनी प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेतला. दुधगाव, कवठेपिरान पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले होते.

sandeep Shirguppe

Warna River Polluted : वारणा नदीत प्रदूषित, मळीमिश्रित पाणी सोडून हजारो मासे आणि मगरींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वारणा सहकारी साखर कारखान्याविरुद्ध कारवाई करावी, असा प्रस्ताव कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. तीन-चार दिवसांत या प्रकरणी पुढील कार्यवाही होईल, असे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी माहिती दिली. मात्र, वारणा सहकारी साखर कारखान्याकडूनही याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

प्रदूषण मंडळाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीवर वारणा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शहाजी भगत यांनी स्पष्टीकरण दिले. भगत म्हणाले की, "वारणा नदीतील मासे, मगरीच्या मृत्यूशी वारणा साखर कारखान्याचा काहीही संबंध नाही. आम्ही कोणत्याही स्वरूपात पाणी नदीत सोडलेले नाही. मासे वारणा कारखान्याच्या वरील बाजूकडून मृतावस्थेत खाली आले आहेत. आमचा कारखाना जुना आहे, आमच्याकडे पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरले जाते. आम्हाला नोटीस आल्यास त्याला उत्तर देऊ." असे संचालक शहाजी भगत यांनी सांगितले.

चांदोली धरणापासून ते हरिपूर येथे संगमापर्यंत पाहणी केली. त्यात वारणा सहकारी साखर कारखान्यातून प्रदूषित पाणी सोडल्याचा संशय आला. त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेण्यात आले. ते तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अहवाल पथकाने सादर केला असून, वारणा साखर कारखान्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वारणा नदी पात्रात मागच्या दोन दिवसांपूर्वी दुधगाव येथे दीड फुटाचे मगरीचे पिल्लू तर उदगाव येथे पूर्ण वाढ झालेली मगर मृतावस्थेत तरंगताना आढळली. त्याच ठिकाणी मृत माशांचा खचही होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगली आणि कोल्हापूर कार्यालयाच्या पथकाने नदीच्या दोन्ही बाजूनी प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेतला. त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. काही मासे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रदूषण मंडळाकडून देण्यात आली.

दरम्यान, सोमवारी अंकली उदगाव येथील मासेमारांना दिसलेल्या मगरीच्या मृतदेहाची वन विभागाकडून मंगळवार(ता.१०) पासून शोधाशोध सुरू आहे. मात्र तो मृतदेह आढळला नाही. दुधगाव येथे आढळलेल्या मगरीच्या पिलाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याचे त्याचे शवविच्छेदन करता येणार नाही, असा अहवाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे वन विभागाने आता हात वर केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT