Sugarcane Variety : उसाचा नवीन वाण : फुले ऊस १५००६

Phule Sugarcane 15006 : फुले ऊस १५००६ या नवीन वाणाचे ऊस उत्पादन व साखर उत्पादन अधिक आहे. क्षार जमिनीमध्ये या वाणाची उगवण क्षमता चांगली आहे.
Phule Sugarcane 15006
Phule Sugarcane 15006Agrowon
Published on
Updated on

डॉ. सुरेश उबाळे, डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. माधवी शेळके

New variety of sugarcane : फुले ऊस १५००६ या नवीन वाणाचे ऊस उत्पादन व साखर उत्पादन अधिक आहे. क्षार जमिनीमध्ये या वाणाची उगवण क्षमता चांगली आहे. हा वाण जाड, उंच वाढणारा, न लोळणारा, पाचट सहज निघणारा, पाचटावर कूस नसणारा आणि काणी रोगास प्रतिकारक आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने अधिक ऊस उत्पादन (१६४ टन/हे) आणि अधिक साखर उत्पादन (२३.९२ टन/हे) देणारा उसाचा नवीन वाण विकसित केला आहे. २०१२ पासून फुले ऊस १५००६ हा वाण केंद्र, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील चाचण्यांमध्ये उत्तम असल्याचे दिसून आले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ५२ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत या वाणास आडसाली, पूर्वहंगामी व सुरू हंगामामध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यास मान्यता मिळाली.

Phule Sugarcane 15006
Sugarcane Varieties : ऊस वाणांचा ऱ्हास: कारणे आणि उपाययोजना

साखर कारखाना क्षेत्रामध्ये साखर कारखान्याचा सुरुवातीला व शेवटी अधिक साखर उतारा नियमित टिकवण्यासाठी हंगाम निहाय ५ ते ६ विविध लवकर, मध्यम व उशिरा पक्वता गटातील तसेच हलकी, मध्यम व भारी जमिनीसाठी उसाच्या नवीन वाणाची गरज असते. हे लक्षात घेऊन फुले ऊस १५००६ या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे अधिक उत्पादन देणारा प्रचलित वाण फुले ०२६५ आणि अधिक साखर देणारा वाण को ९४०१२ यांच्या संकरातून फुले ऊस १५००६ हा वाण तयार झाला आहे. एमएस १०००१, फुले ऊस १५०१२ तसेच फुले ऊस १३००७ नंतर फुले ऊस १५००६ हा उसाचा पाडेगाव संशोधन केंद्रावर संकर करून निर्माण केलेला चौथा वाण आहे.

Phule Sugarcane 15006
Sugarcane Variety : भारतातही जीएम उसासह अन्य पिकांना चालना

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे अधिक उत्पादन देणारा प्रचलित वाण फुले ०२६५ आणि अधिक साखर देणारा वाण को ९४०१२ यांच्या संकरातून फुले ऊस १५००६ हा वाण तयार झाला आहे. एमएस १०००१, फुले ऊस १५०१२ तसेच फुले ऊस १३००७ नंतर फुले ऊस १५००६ हा उसाचा पाडेगाव संशोधन केंद्रावर संकर करून निर्माण केलेला चौथा वाण आहे.

हा वाण मध्यम पक्वता गटातील आहे. २०१८ ते २०२० मधील ३० बहुस्थानीय चाचणीमध्ये फुले ऊस १५००६ या वाणाचे विविध प्रयोगामधील सरासरी ऊस उत्पादन आणि साखर उत्पन्न १९९६ साली प्रसारित करण्यात आलेल्या को ८६०३२ या प्रचलित वाणापेक्षा अधिक आहे. फुले ऊस १५००६ या नवीन वाणाचे ऊस उत्पादन व साखर उत्पादन अधिक आहे. क्षार जमिनीमध्ये या वाणाची उगवण क्षमता चांगली आहे. हा वाण जाड, उंच वाढणारा, न लोळणारा, पाचट सहज निघणारा, पाचटावर कूस नसणारा आणि काणी रोगास प्रतिकारक आहे. त्याचबरोबर चोपण जमिनीत चांगली उगवणक्षमता आहे. हा वाण पाण्याचा ताण सहन करणारा आहे.

वाणाची वैशिष्ट्ये

को ८६०३२ पेक्षा अधिक ऊस व साखर उत्पादन, खोडव्यासाठी उत्तम.

ऊस सरळ जाड व उंच, न लोळणारा असल्याने तोडणी यंत्राच्या साहाय्याने कापणी शक्य.

पाने गर्द हिरवी, देठावर कूस नाही.

ऊस दंड गोलाकार, गर्द जांभळ्या रंगाचा आहे.

लाल कूज, मर रोगास मध्यम प्रतिकारक. काणी, पिवळ्या पानाच्या रोगास प्रतिकारक्षम.

खोडकीड,कांडी किडीस कमी बळी पडणारा वाण.

तुरा उशिरा व अल्प प्रमाणात येतो.

पाण्याचा ताण अधिक काळ सहन करण्याची क्षमता.

फुले ऊस १५००६ आणि को ८६०३२ या वाणाचा ऊस आणि साखर उत्पादनातील तुलना हंगाम ऊस उत्पादन

(टन /हे) को ८६०३२ पेक्षा अधिक (टक्के) साखर उत्पादन (टन /हे) को ८६०३२ पेक्षा अधिक (टक्के)

सुरू १३५.०७ १०.२२ १८.९४ १०.३७

पूर्व हंगाम १४७.२० १०.४९ २०.९८ १०.५२

आडसाली १६३.८२ १२.१६ २३.९२ १४.०६

खोडवा १२४.१५ १०.६२ १७.५७ १५.४३

डॉ. सुरेश उबाळे, ९८६०२४४१३२

(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता.फलटण,जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com