Women's Empowerment Mission Programme Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : पाणीपुरवठा संस्थांच्या पाणीपट्टी वाढीस स्थगिती : मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठा संस्‍थांच्या पाणीपट्टीत केलेल्या वाढीस स्थगिती देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Team Agrowon

Kolhapur News : शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठा संस्‍थांच्या पाणीपट्टीत केलेल्या वाढीस स्थगिती देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोरोची (ता. हातकणंगले) येथे शासनाच्या वतीने महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम आयोजित केला होता, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की केंद्र आणि राज्य शासन मिळून डबल इंजिनचे काम करीत आहे. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे.

महिलांसाठी विविध योजना लागू रून त्यांना सक्षम करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडविणारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आहे. त्यासाठी बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट केले आहे.

अंगणवाडी सेविकांनाही मानधन वाढीसह मोबाइल दिला जाणार आहे. कोल्हापुरात महापुराचा त्रास टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ३२०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुराच्या त्रासातून कायमची मुक्तता होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले...

यंत्रमाग उद्योगासाठी अतिरिक्त वीज सवलतीची अंमलबजावणी

इचलकरंजीतील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी देणार

शेतकऱ्यांच्या २०० पट पाणीपट्टी वाढीला स्थगिती

कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावणार

महापुराच्या मुक्ततेसाठी ३२०० कोटींचा प्रकल्प

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ७५० कोटींचा डीपीआर तयार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT