Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey In Solapur : सोलापुरातील वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण

माढा तालुक्यात केवळ एकाच शेतकऱ्याचे दीड एकराचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर बार्शी तालुक्यातील सात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

Team Agrowon

Solapur Crop Damage Update : सोलापूर जिल्ह्यात १४ ते १८ मार्च या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे सुमारे ३ हजार ६०७ शेतकऱ्यांचे दोन हजार ३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

त्यासंबंधीचे पंचनामे पूर्ण झाले असून, आता हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्तपणे हे पंचनामे पूर्ण केले आहेत. उत्तर सोलापूर, सांगोला, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यात नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला आहे.

माढा तालुक्यात केवळ एकाच शेतकऱ्याचे दीड एकराचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर बार्शी तालुक्यातील सात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

एकूण नुकसानीच्या क्षेत्रात १ हजार ५१२ शेतकऱ्यांच्या ९७२ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यात माळशिरस, करमाळा आणि पंढरपूर या तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत.

या संपूर्ण नुकसानीपोटी तीन कोटी ९२ लाख ८२ हजार १२५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे या अहवालाद्वारे केली आहे. पण आता नेमकी ही मदत कधी आणि किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT