Khadakwasla Dam Drains Agrowon
ॲग्रो विशेष

Survey of Drains: खडकवासला धरणांच्या क्षेत्रातील ७० नाल्यांचे सर्वेक्षण होणार

Khadakwasla Dam: खडकवासला धरण क्षेत्रातील ७० नाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नागरीकरण वाढले आहे. परिणामी, या भागातील नाल्यांमधील सांडपाणी थेट धरणात येत आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: गेल्या काही वर्षांपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नागरीकरण वाढले आहे. परिणामी, या भागातील नाल्यांमधील सांडपाणी थेट धरणात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्रातील ७० नाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात प्रदूषित पाणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंगळवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत दिली.

खडकवासला भरण भागात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पीएमआरडीएला सूचना करण्यात येणार आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, की गेल्या काही वर्षात खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी येत आहे. हे प्रदूषण वेळीच रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाल्यांचे सर्वेक्षण केले जात आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी वीस वर्षांचा कार्यक्रम

शहराचा विस्तार आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषणही वाढत असून महापालिका त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करत असली, तरी शहरातील भविष्याचा विस्तार लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने पुढील २० वर्षांचा प्रदूषण नियंत्रण सर्वंकष आराखडा तयार करावा, त्यात प्रामुख्याने वायू, नदी प्रदूषण यांसह प्लॅस्टिक आणि धुळीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाय योजनांचा समावेश करावा. प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती करावी, कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेला जागा मिळवून देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ मदत करेल, असे आश्वासनही कदम यांनी दिले

प्रमुख बाबी :

- बांधकामामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा.

- सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प थेट नाल्यांवर उभारावेत.

- भविष्यात वाढणाऱ्या सांडपाणी शुद्धीकरणाची आताच तयारी करावी.

- प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध आणावेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT