डॉ. किरण वर्णेकर, डॉ. प्रशांत पवार, डॉ. संग्राम धुमाळGreen Fodder Farming: पशुधनासाठी वर्षभर पुरेसा आणि पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी हंगामी तसेच बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरते. बरसीम, चवळी, संकरित नेपियर आणि मारवेल या चारा पिकांची निवड, सुधारित वाण, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन आणि योग्य वेळी कापणी केल्यास चाऱ्याचे चांगले उत्पादन घेता येते..बरसीम (घोडा घास)दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी बरसीम (घोडा घास) हे महत्त्वाचे चारा पीक आहे.लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.पेरणीपूर्वी जमिनीची एक नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी..Cactus as Fodder: कमी पाण्यात येणारा बिनकाटेरी निवडुंगाचा हिरवा चारा जनावरांसाठी फायदेशीर.लागवडीसाठी वरदान व मेस्कावी या सुधारित वाणांचा वापर करावा.पेरणी २५ ते ३० सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी २५ किलो बियाणे वापरावे.पिकाच्या चांगल्या उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. त्यासाठी साधारणतः १० ते १२ दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे..पिकाची वाढ चांगली होण्यासाठी वेळेवर तण नियंत्रण व योग्य वेळी कापणी महत्त्वाचे आहे. बरसीमची पहिली कापणी पेरणीनंतर साधारणतः ४५ ते ५० दिवसांनी, तर त्यानंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. योग्य व्यवस्थापनाखाली एका हंगामात ३ ते ४ कापण्या घेता येतात.योग्य व्यवस्थापनातून हेक्टरी सुमारे ६०० ते ८०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते. बरसीम चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणतः १७ ते १९ टक्के असते. त्यामुळे हा चारा पशुधनासाठी अत्यंत पौष्टिक ठरतो..चवळीचवळी पिकासाठी मध्यम ते भारी व चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची पूर्वमशागत करताना एक नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.चवळी लागवडीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा.चवळी पेरणी पाभरीने ३० सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे वापरावे..पेरणीपूर्वी प्रति १० किलो बियाण्यास रायझोबियम २५० ग्रॅम या प्रमाणे हे जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.खत व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी ४ टन शेणखत द्यावे. रासायनिक खतांमध्ये हेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद पेरणीपूर्वी जमिनीत द्यावे.तण नियंत्रणासाठी एक खुरपणी व एक कोळपणी करून शेत तणविरहित ठेवावे..पाणी व्यवस्थापन करताना उन्हाळी हंगामात ७ ते १० दिवसांच्या अंतराने सिंचनाचे नियोजन करावे.पेरणीनंतर साधारणतः ६० ते ६५ दिवसांनी चवळी पिकाची कापणी करावी. या पिकापासून हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते. चवळीच्या हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणतः १३ ते १५ टक्के असते..Fodder Cultivation: तलावाच्या गाळपेरा जमिनीवर चारा लागवड.संकरित नेपियर गवतदुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून करण्यासाठी संकरित नेपियर हे महत्त्वाचे बहुवार्षिक चारा पीक आहे.लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची एक नांगरट व दोन ते चार कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.सुधारित वाणांमध्ये फुले जयवंत (आर.बी.एन. १३), फुले गुणवंत (आर.बी.एन. २०११-२१) आणि बायफ-११ या वाणांचा वापर करावा..उन्हाळी हंगामात फेब्रुवारी-मार्च या कालावधीत लागवड करावी.दोन ओळींत १०५ सें.मी. आणि दोन रोपांत ६० सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. लागवडीसाठी दोन डोळे असलेले निरोगी खोडाचे तुकडे किंवा योग्य वयाच्या मुळांसह असलेल्या रोपांचा वापर करावा.एका हेक्टर क्षेत्रासाठी साधारणतः २८,५०० ते ३०,००० बेणे लागते.या चारा पिकासाठी हेक्टरी ५ टन शेणखत, १२५ किलो नत्र, ६५ किलो स्फुरद व ५० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. यापैकी ६५ किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीपूर्वी द्यावे. त्यानंतर प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी ३० किलो नत्र व ३७.५० किलो स्फुरद द्यावे..नियंत्रणासाठी गरजेनुसार खुरपणी व कोळपणी करावी. पिकाची सुरुवातीच्या काळात योग्य वाढ होण्यासाठी तण नियंत्रण महत्त्वाचे आहे.पाण्याचे नियोजन करताना १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.पहिली कापणी लागवडीनंतर साधारणतः ६० दिवसांनी करावी. त्यानंतर साधारणतः ४५ ते ५० दिवसांच्या अंतराने कापण्या घ्याव्यात..मारवेल गवतमारवेल गवत लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार व उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची पूर्वमशागत करताना एक नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.लागवडीसाठी फुले गोवर्धन या सुधारित वाणाचा वापर करावा.लागवडीपूर्वी जमिनीची उभी व आडवी नांगरट करून जमिनीची मशागत करावी..पेरणीसाठी ४५ बाय ३० सें.मी. अंतरावर दोन डोळे असलेली कांडी ओळीत एक डोळा जमिनीत व एक डोळा जमिनीवर राहील अशा पद्धतीने लावावी. लागवडीसाठी हेक्टरी साधारणतः ७५,००० दोन डोळे कांडीचा वापर करावा.खत व्यवस्थापनासाठी हेक्टरी ३० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश पेरणीपूर्वी द्यावे. प्रत्येक कापणीनंतर ३० किलो नत्र द्यावे.पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या करणे अत्यंत आवश्यक आहे..पिकाच्या योग्य वाढीसाठी १० ते २५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे.पहिली कापणी साधारणतः ५० ते ६० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या ४५ ते ५० दिवसांच्या अंतराने कराव्यात.यापासून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रति हेक्टरी प्रति वर्ष ६०० ते ७०० क्विंटल इतके मिळू शकते.- डॉ. किरण वर्णेकर ९८२३८४५१९१(कृषिविद्या विभाग, यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय, कराड).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.