Mango Blossom Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Survey : आंबा मोहर समितीकडून रत्नागिरीत ४८ गावांत सर्व्हेक्षण

Unseasonal Rain : जानेवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे सध्या हापूस आंबा मोहरावर व फळधारणेवर थ्रीप्स (फुलकिडी), तुडतुड्याचा परिणाम झालेला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : जानेवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे सध्या हापूस आंबा मोहरावर व फळधारणेवर थ्रीप्स (फुलकिडी), तुडतुड्याचा परिणाम झालेला आहे.

तसे निरीक्षण सर्वेक्षण आंबा मोहर समितीने नोंदविले आहे. हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फवारणीबरोबरच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला समितीने दिला आहे. आंबा मोहर समितीने जिल्ह्यातील ४८ गावांत केलेल्या सर्व्हेक्षणाअंती प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे सादर केला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ऑक्टोबर हीट जाणवली. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहर सुरू झाला. मात्र जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहर मात्र टिकून आहे. पहिल्या मोहराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहर चांगला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे. काही ठिकाणी कणी, तर काही ठिकाणी सुपारी एवढा आंबा झाडावर आहे. हा आंबा मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, बागायतदारांनी योग्य उपाययोजना केल्याने तुडतुडा आटोक्यात आणण्यात यश आले होते;

परंतु तुडतुडा व फुलकिडीचा प्रादुर्भाव वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना या किडी आटोक्यात आणणे अवघड बनले आहे. कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने समस्येत भर पडली असून फवारणींची संख्या वाढली आहे. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याची नोंदही समितीने अहवालात केली आहे. समितीने रत्नागिरी तालुक्यात पावस, मालगुंड, हरचेरी, तसेच गुहागर, दापोली, राजापूर या प्रामुख्याने हापूस लागवड क्षेत्रातील ४८ गावांमध्ये सर्वेक्षण केले.

दरम्यान किडी-रोगांच्या संकटामुळे कैरीवर डाग आले आहेत. फळांचा दर्जा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणीचा अवलंब केली जात आहे, असे आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT