Crop Damage Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : शहादा तालुक्यात ‘महसूल’कडून पंचनाम्याला सुरुवात

Crop Loss : तालुक्यात गेल्या चार ते पाच महिन्यांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसामुळे सातत्याने पिकांचे नुकसान होत होते.

Team Agrowon

Crop Damage Shahada News : शहादा तालुक्यात रविवारी (ता. ४) सकाळी अचानक आलेल्या वादळामुळे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यांना महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने सुरवात केली असून, या वादळामुळे सुमारे ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यात गेल्या चार ते पाच महिन्यांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसामुळे सातत्याने पिकांचे नुकसान होत होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची मदत मिळत नाही तोच पुन्हा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे.

रविवारी आलेल्या जोरदार वादळामुळे अक्षरशः शेतांमध्ये पिके जमीनदोस्त झालेली आहेत. त्यात सर्वाधिक नुकसान केळी पिकांचे झालेले आहे. शहादा तालुक्यात साधारणता पाच हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड केली आहे. याव्यतिरिक्त मका पिकाचेदेखील नुकसान झाले आहे.

या वादळामुळे तालुक्यात ग्रामीण भागात शेतांमधील उभी केळीची झाडे जमिनीवर आडवी पडली. केळीचे घडच्या घड जमिनीवर पडून इकडेतिकडे फेकले गेले होते. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतलेला आहे. तहसीलदार दीपक गिरासे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

त्या आधारावर लागलीच नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. काहींची केळी शेताच्या बांधावर ठेवली जात होती. काही शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू होते. काही व्यापाऱ्यांच्या गाड्यादेखील शेतात उभ्या होत्या.

अशा स्थितीत अचानक वादळ आल्याने सारे काही जमीनदोस्त झाले. नुकसान झालेली केळी तसेच खराब झालेली केळी व्यापारी आता मातीमोल घेतील, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या वर्षी केळी पीक लावले होते. साडेअकरा महिन्याची केळी झालेली होती. व्यापारी केळी काढण्यासाठी गाड्या घेऊन शेतात आलेले होते. मजूरदेखील शेतातच होते. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे सारे काही जमीनदोस्त झालेले आहे. शेतातील केळीची झाडे पूर्णतः आडवी पडली. तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन बँकांचे कर्ज शेतीसाठी काढले आहे. पुढच्या वर्षी मुलींचे लग्न करायचे आहे. अशा परिस्थितीत केळी पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन केवळ घोषणाबाजी न करता तत्काळ भरपाई दिली गेली पाहिजे.
माधवराव पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT